मकर संक्रांतीच्या शुभेच्छा || Makar Sankranti Wishes in Marathi ||

Makar Sankranti Wishes in Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा | Makar Sankranti Wishes | मकर संक्रांती शुभेच्छा | Makar Sankrantichya Hardik Shubhechha | मकर संक्रांती शुभेच्छा मराठी | Happy Makar Sankranti Wishes in Marathi

“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला”

मकर संक्रांत:

पौष महिन्यात येणारा मकर संक्रांत हा एक खास उत्सव आहे, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. या बदलासोबतच दिवस मोठे होऊ लागतात. या सणाचे खास आकर्षण म्हणजे तीळगूळ वाटून ‘गोड बोला’ असे म्हणण्याची प्रथा आणि आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवण्याचा आनंद. तीळ आणि गूळ हे स्नेह आणि एकतेचे प्रतीक मानले जातात.

हा सण नवीन पिकांच्या हंगामाची सुरुवात असल्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात ‘संक्रांत’ म्हणून साजरा होणारा हा सण, विविध राज्यांमध्ये पोंगल, खिचडी अशा वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो.

ज्याप्रमाणे मकर संक्रांती नवीन सुरुवात आणि समृद्धीचा संदेश देते, त्याच प्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या नातेवाईक व मित्र परिवारांना द्या ह्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त खास शुभेच्छा!

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा || Makar Sankranti Wishes in Marathi ||

द्या तुमच्या खास मित्र, परिवार आणि आप्तेष्टांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, तुम्ही ह्या शुभेच्छा Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता:

(१ ) तीळगूळ घ्या, गोड बोला, प्रेमळ नात्यांचा धागा जुळवा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु… मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु.. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) नवीन आकाशात, नवीन पतंग, नवीन स्वप्नांची ही नवी भरारी. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) ढिल सोडा, उंच उडू द्या पतंग, आनंदाने साजरा करूया हा सण. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • 【High Quality Floor Mats】The household kitchen mat is made of four layers of material, which helps reduce the damage of …
  • 【Absorbent Quick Dry】Highly absorbent, penetrates quickly and does not build up. It absorbs water and oil stains quickly…
  • 【Double-Sided Non-Slip, Safe Companionship】The surface crocodile leather texture is the first anti-slip design, which is…

(५ ) पतंगाच्या दोऱ्याने कापावे विघ्न सारे, सुख-समृद्धीचे वारे वाहू दे तुमच्या द्वारे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) नात्यांचा गोडवा, तिळासारखा जुळू दे, प्रेमाचा सुगंध, गुळासारखा दरवळू दे. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

(७ ) पतंगांसारखे उंच उडावे विचार, प्रगतीचा मार्ग होवो तुमचा साकार. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास!

(८ ) तीळ आणि गुळाचा गोडवा, नात्यात राहो सदा, मकर संक्रांतीच्या या शुभदिनी, आनंद असो सर्वदा.

(९ ) आकाशी उंच पतंग उडावे, तुमचेही स्वप्न तसेच फुलावे यशाच्या उंचीवर तुम्ही पोहोचावे. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१० ) मांजा, चक्री, पातंगाची काटाकाटी, हलवा, तीळगुळ, गुळपोळी संक्रांतीची लज्जत न्यारी तिळगुळ घ्या गोड गोड बोला!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा (Makar Sankranti Wishes in Marathi)

happy makar sankranti wishes Marathi:

(१ ) उत्तरायण सूर्याचे, नवी ऊर्जा देई, तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देई. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

(२ ) वारा झुळूक, पतंगाची साथ, रंगांची उधळण, नवी सुरुवात. सुख-समृद्धीची होवो बरसात, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा खास!

(३ ) तीळाची गोडी प्रेमाची माडी माडीचा जिना प्रेमाच्या खूणा मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना म्हणूनच एक तीळ सात जना , मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास हॅप्पी मकर संक्रांती!

(५ ) तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत, नात्यातला आणि माणसांमधील गोडवा वाढवूया, मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला हार्दिक शुभेच्छा!

(६ ) गोड गोड शब्दांचा फुलवा पाक, स्नेहांचे तिळ मिळवा त्यात, तिळावर फुलेल पाकाचा काटा, प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा…मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) आठवण सुर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा तिळगुळ घ्या अन् गोड गोड बोला. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) साजरे करू मकर संक्रमण संकटांवर करून मात, हास्याचे हलवे फुटून तिळगुळांची करू खैरात. संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा!

(९ ) नववर्षाचा पहिला वहीला सण चौफेर पसरवा आनंदाचे धन, तिळगुड वाटून वाढवा गोडवा नात्यात जवळीक असूद्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) गुळातील गोडवा ओठांवर येऊ द्या, मनातील कटवटपणा बाहेर पडू द्या, या संक्रांतीला तीळगुळ खाताना, मनात आमची आठवण राहू द्या, तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Makar Sankranti Wishes in Marathi

मकर संक्रांती शुभेच्छा मराठी:

(२१ ) मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! ह्या सणानिमित्ताने तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी येवो!

(२ ) झाले गेले विसरून जाऊ, तिळगुळ खात गोड गोड बोलू.. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) विसरून सारे हेवे-दावे तीळगुळाचा आज स्वाद घ्यावा, नव्या वर्षाच्या पहिल्या सणासह बंध नात्याचा अधिक दृढ व्हावा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) तीळ आणि गुळासारखीच रहावी आपली मैत्री घट्ट आणि गोड, मकर संक्रांतीला आज तीळगूळ घे आणि फक्त गोड गोड बोल! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) थंडीतला गारवा, मायेतील ओलावा आणि प्रेमातील गोडवा असाच कायम रहावा ही सदिच्छा मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे देखील पहा :

Leave a Comment