Republic Day Wishes in Marathi || प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ||

Republic Day Wishes | Republic Day Wishes in Marathi | प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा | प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा इन मराठी | २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन शुभेच्छा |

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खुप खुप शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन:

२६ जानेवारी हा दिवस म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० साली याच दिवशी आपल्या देशाचे संविधान लागू झाले आणि खऱ्या अर्थाने भारत एक सार्वभौम (स्वतंत्र), लोकशाही आणि गणराज्य बनला. हा दिवस भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा आणि गौरवाचा दिवस आहे.

सार्वभौम’ या शब्दाचा अर्थ असा की, भारत आता कोणाच्याही हुकुमाखाली नाही, आपले निर्णय आपणच घेतो. ‘लोकशाही’ म्हणजे आपल्या सगळ्यांचे, म्हणजेच जनतेचे राज्य! आपण निवडलेले नेतेच देशाचा कारभार पाहतात. आणि ‘गणराज्य’ म्हणजे आपल्या देशाचे प्रमुख, राष्ट्रपती, हे निवडणुकीने निवडले जातात, इथे राजा-महाराजांची परंपरा नाही.

आपल्या संविधानाने आपल्याला समानता, स्वातंत्र्य आणि न्याय असे महत्वाचे अधिकार दिले, ज्यामुळे आपले आयुष्य अधिक सुरक्षित आणि चांगले झाले आहे. प्रजासत्ताक दिनामुळे आपल्या देशात कायद्याचे राज्य आले आणि सगळ्यांना एकत्र आणले.

हा दिवस फक्त एक उत्सव नाही, तर आपल्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची आठवण करून देणारा एक महत्वाचा दिवस आहे!

Republic Day Wishes in Marathi || प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा ||

द्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा (Republic Day Wishes in Marathi), तुम्ही Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता:

Republic Day Wishes in Marathi

(१ ) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) गणराज्य दिनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!

(३ ) २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा!

(४ ) रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) विविधता जपतो, एकतेचा धागा विणतो, शांतता टिकवतो, माणूसकीचा धर्म पाळतो. भारतीय असल्याचा गर्व मनी बाळगतो, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो!

(६ ) आपला देश विविध रंगांचा, ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणजे भारत! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(८ ) एक भारत श्रेष्ठ भारत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(९ ) गणराज्य दिन हा आपल्या देशाचा अभिमान आणि शक्तीचा प्रतीक आहे, या दिवशी सर्वांना शुभेच्छा!

(१० ) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश नेहमी प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर राहो.

  • 【High Quality Floor Mats】The household kitchen mat is made of four layers of material, which helps reduce the damage of …
  • 【Absorbent Quick Dry】Highly absorbent, penetrates quickly and does not build up. It absorbs water and oil stains quickly…
  • 【Double-Sided Non-Slip, Safe Companionship】The surface crocodile leather texture is the first anti-slip design, which is…

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Republic Day Wishes in Marathi )

Republic Day Wishes in Marathi २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा:

(१ ) बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. भारत देश माझा. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(२ ) या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया, भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध होऊया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(३ ) आज प्रजासत्ताक दिनी, आपण आपल्या देशाला अधिक बलवान आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करूया. जय हिंद!

(४ ) स्वप्न सगळे बघती, स्वतःसाठी अन इतरांसाठी, आज एक स्वप्न पाहू, देशासाठी आपल्या सर्वांसाठी, सुरक्षित, सुविकसित भारत, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(५ ) प्रजासत्ताक दिनी संघर्षाच्या काळाचा सन्मान करून, वर्तमान साजरे करुया आणि भावी पिढ्यांसाठी आशादायी भविष्य घडवूया. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(६ ) प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाची प्रगती आणि समृद्धीसाठी काम करूया.

(७ ) लहरतो आहे तिरंगा अभिमानाने उंच आज या आकाशी, उजळत ठेवू सारे रंग त्याचे घेऊ प्रण हा मनाशी. प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(८ ) उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

(९ ) सलाम करा या तिरंग्याला जी तुमची शान आहे…मान नेहमी वर उंच ठेवा जो पर्यंत प्राण आहे…जय हिन्द, जय भारत. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा!

(० ) स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा, संविधानाच्या प्रकाशात, मार्ग दिसे एकतेचा. भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा हा मानाचा, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की खरी शक्ती ही जनतेच्या हातात आहे. चला, आपण आपल्या हक्कांचा वापर जबाबदारीने करूया आणि देशाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावूया.

जय हिंद! | वंदे मातरम्! | भारत माता की जय! |

हे देखील पहा :

Leave a Comment