गटारी अमावस्येच्या शुभेच्छा || Gatari Wishes in Marathi ||

Gatari Wishes in Marathi | Gatari | Gatari Amavasya | Gatari Wishes | गटारी अमावस्या | गटारी अमावस्येच्या शुभेच्छा | दीप आमवास्येचा शुभेछा | Deep Amavasya Wishes |

आली आली गटारी खाण्यापिण्याचा बेत करा लय भारी एकाच दिवसात लुटून घ्या पुढल्या १ महिन्यांची मौज सारी. गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

गटारी अमावस्या | आषाढी अमावस्या | दीप अमावस्या |

श्रावण हा महिना व्रतवैकल्यं, पूजा-विधी आदी गोष्टींसाठी शुभ मानला जातो आणि त्या नंतरच गणपती बापांचे आगमन नंतर नऊरात्र व दसरा हे सण लागोपाठ असल्याने मांसाहार व तामसिक आहार ह्या महिन्यात पूर्णपणे टाळला जातो.

पाऊसाच्या ह्या काळात मासे व अन्य प्राण्यांचा प्रजननाचा काळ मानला जातो, तसेच पावसाळ्यात वातावरणातील बदलाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे आपली पचनशक्ती थोडी मंदावली असते.

आषाढ अमावस्येला पितरांना शांती मिळावी यासाठी काही उपायही केले जातात. पितरांसाठी नैवेद्य ठेवला जातो. तर सायंकाळी दीव्यांची पूजाही केली जाते. त्यामुळेच या अमावस्येला दीप अमावस्या असेही ओळखली जाते.

दिव्यांची पूजा केल्याने, देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन, आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे.

आषाढ अमावस्येलाच गटारी अमावस्या म्हणून नवी ओळख मिळाली आहे.

गटारी अमावस्या ही महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. श्रावणा अगोदर ह्या दिवशी मांसाहार करून मोठया उत्साहाने केला जातो. मांसाहारा सोबत हा दिवस मद्यपान करणारे सुद्धा मोठया उत्साहाने साजरा करतात.

त्या नंतर पूर्ण श्रावण महिन्यात मांसाहार व तामसिक आहार पूर्णपणे टाळला जातो.

गटारी अमावस्येच्या शुभेच्छा || Gatari Wishes in Marathi ||

खाली दिलेल्या गटारी अमावस्याच्या शुभेच्छा तुम्ही सहज sms, Text, Whatsapp Message द्वारे शेअर करू शकता(Gatari Wishes in Marathi):

Gatari Wishes in Marathi

(१ ) मजा करा, पोटभर खा आणि मजेत राहा!” गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) तुम्हा आणि तुमच्या परिवाराला गटारी अमावस्या च्या खुप खुप पोटभरुन शुभेच्या!

(३ ) नागमोडया पावलांना, कोंबडी वड्यांचा आधार, तर्रीवाल्या टोपाला मासोळीचा सत्कार, पण, गटारीच्या सेलिब्रेशनमध्ये खर्च झाला पगार…

(४ ) आली आली गटारी खाण्यापिण्याचा बेत करा लय भारी एकाच दिवसात लुटून घ्या पुढल्या महिन्यांची मौज सारी. गटारीच्या शुभेच्छा!

(५ ) ही गटारी अमावस्या, सणाचे चैतन्य तुमचे आरोग्य बळकट करेल आणि तुमचे जीवन आनंदाच्या खजिन्याने समृद्ध करेल. या सणाच्या जल्लोषात आनंद लुटा.

(६ ) ओकू नका, माकू नका, मटणावर जास्त ताव मारु नका, फुकट मिळाली तर ढोसू नका दिसेल त्या गटारात लोळू नका. गटारीच्या शुभेच्छा!

(७ ) या गटारी अमावस्या, तुम्हाला सर्व आनंद आणि सुंदर जेवण मिळो! आनंद साजरा करा.

(८ ) आली आली गटारी बायको डोळे वटारी. गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!

(९ ) चिकन, मटण, मच्छी, सगळा बेत करा खास दारू कशाला हवी एवढाच बेत बास. हॅप्पी गटारी!

(१० ) आज प्रत्येकाच्या हातात मोबाइलची जागा काळ्या पिशवीने घेतली असतली गटारीच्या तुम्हाला शुभेच्छा.

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा ( Gatari Wishes in Marathi )

खाली दिलेल्या Gatari Wishes in Marathi तुम्ही सहज sms, Text, Whatsapp Message द्वारे शेअर करू शकता:

आषाढी अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा

(११ ) मद्य सत्य जगं मिथ्या. गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(१२ ) हि गटारी तुम्हाला हाई किक्क ची जावो आणि तुमची फुकट पिण्याची सोय होवो…गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

(१३ ) काहि लोक गटारी होळी आणि 31st ची अशी तयारी करतात जसेकाही बाकी 362 दिवस बोर्नव्हीटा पिऊन फक्त डिंकाचे लाडूच खातात..गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

(१४ ) चिकनचा रस्सा त्याला मटणाची साथ, मच्छीची आमटी सोबत बिर्याणी भात बांगड्याच्या कढीने भरलेलं ताट खाऊन घ्या सगळं श्रावण महिना यायच्या आत. गटारीच्या हार्दिक शुभेच्छा.

(१५ ) गरम गरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट, तळलेली सुरमई अशा चमचमीत मांसाहारी पदार्थांच्या सोबत रम व्हिस्की बिअर चा आस्वाद घेत जोरात साजरी करू या गटारी गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!

(१६ ) आम्ही बेवडे असलो म्हणूनि काय जाहले ।! आमचा – Stamina – अपरंपार…!! हम पियेंगे भी – अपनी मर्जी से पडेंगे भी – अपनी मर्जी से…!!चला “कॉटर येऊ दया…!गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

(१७ ) सुक्या बोंबीलाचे तोरण लावा दारी.. तळलेल्या सुरमईचा वास येऊ द्या तुमच्या घरी…. चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी… आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी.. पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा… गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा….. झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…

(१८ ) आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे यंदा ही मी दिनांक ५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ पर्यंत श्रावण पाळायचे ठरविलेले आहे… तरी तत्पूर्वी ज्या कुणाला मला गटारी उत्सवासाठी आमंत्रित करावयाचे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा, आज पासूनच बुकिंग घेतलं जाईल……..लक्षात असुद्या..

(१९ ) आज गटारीच्या शुभेच्छा देणारे , उद्या अमावास्याचे महत्व समजावून सांगणार.

(२० ) मोसम मस्ताना !!! Phone करा बसताना !!! गटारीच्या शुभेच्छा.

गटारी अमावस्या शुभेच्छा ( खास बेवड्या मित्रांसाठी )

खाली दिलेल्या Gatari Amavasya Wishes in Marathi तुम्ही सहज sms, Text, Whatsapp Message द्वारे शेअर करू शकता:

image for गटारीच्या हार्दिक शुभेच्छा

(२१ ) मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो, पेग बनवणारा या दिवशी जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो. गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

(२२ ) दारुमुळे आपल्याला घराच्या चिवड्याचे महत्व कळते. परंतु दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते. गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२३ ) यांच्यामते मद्यपान हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे बीयर पिण्यामागे सायन्स तर देशी पिण्यामागे आर्ट आहे. गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२४ ) पिणार्‍यामध्ये प्रेम हा चर्चेचा पहिला विषय आहे देवदासचे खरे प्रेम पारो की दारु’ याचा मला अजून संशय आहे. गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२५ ) प्रत्येक पेग मागे तीची आठवण दडली असते, हा बाटलीत बुडला असतो ती चांगल्या घरी पडली असते. उस दिल टूटे आशिक साठी गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२६ ) ती म्हणते, Drink करु नकोस प्लीज तुला माझी शपथ.. आणि हे साले हरामी मित्र म्हणतात, चल प्यायला तुला तिची शप्पथ..

(२७ ) मराठी आषाढ, शेवटचा दिवस व येणार श्रावण महिना तुमच्या आयुष्यात सुख, शांती व चांगले आरोग्य घेऊन येवो..! हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

दीप आमवास्येचा हार्दिक शुभेछा || Deep Amavasya Wishes ||

खाली दिलेल्या Deep Amavasya Wishes in Marathi तुम्ही सहज sms, Text, Whatsapp Message द्वारे शेअर करू शकता:

(२८ ) आज दीप पूजा.सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य; शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(२९ ) लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश, दीप आमवास्येचा सण खास! दीप आमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(३० ) लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या. दीप आमवास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(३१ ) चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने उजळतील सर्व दिशा, सुखाची नवी उमेद जागवेल दर्श दीप अमावस्या.

(३२ ) आज दीप अमावास्या, दीप पूजनाचा दिवस, अज्ञानरुपी अंधाराचा नाश करून हा दीप सर्वार्थाने उजळो. दीप अमावास्येच्या लक्षलक्ष शुभेच्छा!

(३३ ) दिवा म्हणे वातीला, सांग मानव जातीला सुखासोबत दु:खातही, रहा एकमेकांच्या साथीला. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेछा!


Gatari Amavasya Wishes in Marathi

(३४ ) सर्वांच्या घरी सुख, शांति चे लक्षदीप सदैव तेवत राहो. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!

(३५ ) चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योतीअशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! दीप आमवास्येचा हार्दिक शुभेछा.!!

Leave a Comment