भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी || Bhau Beej Wishes in Marathi ||

Bhau Beej Wishes in Marathi | Happy Bhau Beej Wishes in Marathi | भाऊबीज मराठी संदेश | भाऊबीज शुभेच्छा | हॅप्पी भाऊबीज २०२४ | भाऊबीज २०२४ | भाऊबीज शुभेच्छा मराठी |

नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीज:

भाऊबीज म्हणजेच यम द्वितीया हा एक महत्त्वाचा सण आहे जो भावा-बहिणीच्या नात्याचे महत्त्व दर्शवतो, तर काही ठिकाणी हा दिवस भाई दूज म्हणून सुद्धा ओळखला जातो.

भाऊबीजेशी संबंधित यमराज आणि त्यांची बहीण यमुना हिची एक प्रसिद्ध कथा आहे. असे म्हटले जाते की यमराज आपल्या बहिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी या दिवशी आले आणि यमुनाने त्याचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तिच्या भक्तिभावाने प्रभावित होऊन यमराजाने अशी घोषणा केली की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडे जाईल, त्याला दीर्घायुष्य आणि सौभाग्य लाभेल. या परंपरेचा भाग म्हणून बहिणी आपल्या भावाच्या सुरक्षिततेसाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात, तर भावंडे त्यांच्या बहिणींचे संरक्षण आणि पाठिंबा देण्याचे वचन देतात.

या दिवशी परंपरेनुसार बहिणी भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे औक्षण करते, आणि त्याच्या सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो. भाऊबीज हा सण भाऊ आणि बहीण यांच्या नात्याचे प्रतीक आहे, जो प्रेम, संरक्षण आणि आशीर्वाद यांचे महत्त्व अधोरेखित करतो.

Bhau Beej Wishes in Marathi || भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी ||

या भाऊबीजच्या दिवशी द्या Bhau Beej Wishes in Marathi Text, Sms द्वारे Whatsapp, Social Media वर द्या तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळीना भाऊबीजेच्या शुभेच्छा.

(१ ) जपावे नाते निरामय भावनेने, जसे जपले मुक्ताईला ज्ञानेश्वराने. भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(२ ) सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा. भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(३ ) लक्ष दिव्यांना उजळू दे बहीण-भावाचे पवित्र नाते. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) दारी रांगोळी सजली, ज्योतीने पणती सजली, आली आली भाऊबीज आणि दिवाळी आली.

(५ ) जिव्हाळ्याचा आनंद द्विगुणित होऊन दे बहीण-भावाची साथ आयुष्यभर राहू दे. भाऊबीजेच्या खूप शुभेच्छा!

(६ ) क्षणात भांडणार आणि क्षणात हसणार भावा-बहीणीचे नाते असेच राहणार. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

(७ ) भाऊबीजेचा आला सण, बहिणीची प्रार्थना भावाचं प्रेम, बहीण-भावाचं नातं असंच राहो, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) लाल-गुलाबी रंग आहे, आनंदी सारा संसार आहे, सूर्याची किरणं, आनंदाची बहार, घरच्यांच प्रेम घेऊन भाऊबीजेचा सण आला आहे!

(९ ) भाऊबीजेचा सण आहे खूपच खास, कारण असंच नाही होत कोणतंही नातं खास, भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(१० ) नाते भाऊ बहिणीचे नाते पहिल्या मैत्रीचे बंध प्रेमाचे अतूट विश्वासाचे भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी (Bhau Beej Wishes in Marathi)

(११ ) रांगोळीचा सडा आणि दिव्यांची आरास, भाऊबहीणीसाठी आजचा खास आहे दिवस. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१२ ) संसारात जितकी नाती आहेत, त्या सगळ्यात भाऊ-बहिणीचं नातं सर्वात खास आहे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(१३ ) रक्षणाचे वचन, निखळ प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा भाऊबीजेचा सण, भाऊबीजेच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!

(१४ ) सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

(१५ ) जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे! भाऊबीज निमित्त सर्वांना शुभेच्छा!

(१६ ) दिवाळीच्या सोनेरी प्रकाशात पहाट झाली, आनंदाची उधळण करत भाऊबीज आली, भाऊबीजनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

(१७ ) बंध भावनांचे बंध अतूट विश्वासाचे नाते भाऊ-बहिणीचे… सर्व भाऊ-बहिणींना शुभेच्छा!भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

(१८ ) भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव! भाऊबीजनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

(१९ ) चंदनाचा टिळा, औक्षणाचे ताट भावाची आशा, बहिणीची वेडी माया आनंदाने साजरा करा नात्याचा हा सुंदर सण. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) क्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण, लाख लाख शुभेच्छा तुला आज आहे बहीण भावाचा पवित्र सण… भाऊबीज च्या हार्दिक शुभेच्छा!

भावा कडून बहिणीसाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी (from Brother to sister Bhau Beej Wishes in Marathi)

(२१ ) लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया… तुझ्या घरी हे तेज येवो आणि तुझे घर आनंदाने भरो, ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(२२ ) आईप्रमाणे काळजी घेतेस, बाबांप्रमाणे धाक दाखवतेस, सतत माझी पाठराखण करतेस, ताई तुला भाऊबीजेच्या मनपूर्वक शुभेच्छा!

(२३ ) आई नंतर शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ प्रेम करणारं कुणी असेल तर ती म्हणजे बहीण. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(२४ ) देवा माझी बहीण खूप गोड आहे, तिला कोणतेही कष्ट आणि संकट देऊ नकोस. भाऊबीजेच्या छोटीला खूप खूप शुभेच्छा!

(२५ ) तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. ताई तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(२६ ) मनाची आहे हीच इच्छा तुला मिळो सर्व काही जी आहे तुझी इच्छा. प्रिय ताई तुला भाऊबीज शुभेच्छा!

(२७ ) रूसून बसली आहे ताई. आतातरी माझ्याशी बोल ना, माझी चूक माफ करून मला ओवाळ ना. भाऊबीजेच्या ताई तुला शुभेच्छा!

(२८ ) खूप चंचल, खूप आनंदी, खूप नाजूक, खूप निरागस माझी बहीण आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

(२९ ) ताई तुझ्या मायेला आभाळाची उपमा आहे, ताई तुझ्या हाताला अन्नपुर्णेची चव आहे. ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

(३० ) आईप्रमाणे काळजी घेते, बाबांप्रमाणे धाक दाखवते, सतत माझी पाठराखण होते, ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

बहिणी कडून भावासाठी भाऊबीज शुभेच्छा संदेश मराठी (from Sister to Brother Bhau Beej Wishes in Marathi)

(३१ ) तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं, तुझ्या केवळ असण्याने मला आनंदाचं भरतं येतं. दादा तुला भाऊबीजेच्या आभाळभर शुभेच्छा!

(३२ ) बहिणीला हवं फक्त भावाचं प्रेम, नको कोणतीही भेटवस्तू, फक्त आपलं नातं अतूट राहो. माझ्या भावाला मिळो भरपूर प्रेम, भाऊबीज शुभेच्छा!

(३३ ) बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात. बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(३४ ) देवाची कृपा मला भाऊ आहे छोटा, छोटा असला तरी त्याची माया अपरंपार आहे, अशा माझ्या छोट्या भावाला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(३५ ) माझ्या भावाच्या जीवनात येवो ना कोणते दुःख, राहो सदा देवाची कृपा, दादा तुला भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(३६ ) मनात आहे हीच इच्छा, प्रेमाने राहो आपल्यातील बंधुभाव दादा. छोट्या बहिणीकडून तुला भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(३७ ) चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,, भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(३८ ) तू दूर असलास म्हणून काय झालं आपलं नातं सर्वांच्या पलीकडचं आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(३९ ) दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची. भाऊबीजेच्या शुभेच्छा!

(४० ) आकाशकंदीलचा प्रकाश अंगणात पडू दे देवाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे. भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhau Beej Wishes in Marathi | Bahu Beej | appy Bhau Beej | Happy Bhau Beej Wishes in Marathi | भाऊबीज मराठी संदेश | भाऊबीज शुभेच्छा | हॅप्पी भाऊबीज २०२४ | भाऊबीज २०२४ | भाऊबीज शुभेच्छा मराठी |

Leave a Comment