वाढदिवसाच्या शुभेच्छा | वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद | वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार | Thank You Messages | Thank You Messages For Birthday Wishes | वाढदिवसाच्या आभार | वाढदिवसाच्या आभार संदेश | वाढदिवसाच्या आभार संदेश मराठी | वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करणे | emotional thank you messages for birthday wishes | Thank You Messages for Birthday | Thank You Messages for Birthday Wishes in Marathi |
आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी माझ्या वाढदिवसाला एक वेगळाच आनंद दिला.
आपल्या प्रेमळ शब्दांनी आणि शुभेच्छांनी मन भरून आलं.
धन्यवाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद/आभार मानणे हे नुसते शिष्टाचार नाही, तर ते आपल्या मनाच्या तळातून व्यक्त होणारी कृतज्ञता आहे. शुभेच्छाचा आभार व्यक्त केल्यामुळे आपल्याला शुभेच्छा देणाऱ्या व्यक्तींना आपले प्रेम आणि आदर व्यक्त करता येतो. (Thank You Messages For Birthday Wishes)
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद म्हणणे अत्यावश्यक आहे. यामुळे आपल्याला शुभेच्छा देणाऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल अधिक प्रेम आणि आदर निर्माण होतो, आणि आपले संबंध अधिक मजबूत होतात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद (Emotional Thank You Messages For Birthday Wishes)
(१)
मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तोलामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!
(२)
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
ज्या प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या,
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.
(३)
शब्दातूनी कसे
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!
(४)
सदैव राहू द्या आशीर्वादाची
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !
(५)
आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस अधिकच आनंददायी झाला. आपल्या प्रत्येकाच्या प्रेमळ संदेशांबद्दल मनःपूर्वक आभार.
(६)
माझ्या वाढदिवसाला मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छांबद्दल आणि आशीर्वादांबद्दल मी खूप आभारी आहे. आपल्या स्नेहाने आणि शुभेच्छांनी माझा दिवस खूपच सुंदर बनवला.
(७)
आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!
(८)
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल,
मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून
प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
धन्यवाद
(९)
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहु द्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद…!
(१०)
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या
शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहू देत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार व्यक्त करणे (Thank You Messages for Birthday Wishes in Marathi)
आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानायला विसरू नका, कारण हे छोटेसे शब्द त्यांना खूप मोठं समाधान देऊ शकतात.
(११)
आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून
मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.
(१२)
माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!
(१३)
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे
राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!
(१४)
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद!
(१५)
माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या
शुभेच्छांमुळे परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार…
(१६)
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे..
माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
(१७)
फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ आभार !
(१८)
अखंड राहील शिरावर
आपल्या उपकारांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !
(१९)
माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात
सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत,
धन्यवाद…!
(२०)
तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत,
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला,
याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद…!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार | Thank You Messages | Thank You Messages for Birthday |
(२१)
आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील…
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो…
मनापासून धन्यवाद!
(२२)
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!
(२३)
माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो. शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल
की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!
हे देखील पहा :