अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा! || Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi ||

Angarki Sankashti Chaturthi Wishes in Marathi | Ganesh Chaturthi Wishes in Marathi | Happy Ganesh Chaturthi Wishes in Marathi | Sankashti Chaturthi Wishes in Marathi | Ganesh Chaturthi Wishes Marathi | Vinayak Chaturthi Wishes in Marathi | अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा |अंगारकी चतुर्थी शुभेच्छा | संकष्टी चतुर्थी | संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | गणेश चतुर्थी शुभेच्छा |

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

अंगारकी संकष्टी चतुर्थी (Angarki sankashti chaturthi.)

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी, संकटहार चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. हीच संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी/अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व इतर संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यधिक महत्वाचे व शुभ मानले जाते.

व्रत-उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा आणि आराधना केली जाते. अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची मनोभावे पूजा केल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनातली सर्व विघ्नं, संकटं दूर होतात आणि त्याला सुख-समृद्धी प्राप्त होते.

अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं तुमच्या व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया!

अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा || Angarki sankashti chaturthi wishes in marathi ||

सर्व गणेश भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या Angarki sankashti chaturthi wishes in marathi तुम्ही Messages, Sms, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून तुमच्या मित्र-परिवारासोबत शेयर करू शकतात.

(१) भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(२) एकदंताय विद्‍महे। वक्रतुण्डाय धीमहि। तन्नो दंती प्रचोदयात।।– अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(३) मंगलमूर्ती, वरदविनायक, तूच विघ्नहर्ता आणि तूच पालनकर्ता – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(४) सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(५) पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस-अंगारकी संकष्टी चतुर्थी बनवा खास.

(६) आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(७) हार फुलांचा घेऊन वाहू चला हो गणपतीला
आद्य दैवत साऱ्या जगाचे पूजन करूया गणरायाचे –अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८) गजाननाची कृपा तुमच्या वर कायम राहो, प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळो हीच या अंगारकी निम्मित गजानना च्या चरणी प्रार्थना.

(९) अंगारकी निमित्त तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुम्हास लाभो हिच बाप्पा चरणी प्रार्थना. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(१०) तुमच्या सुख- दुःखात बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो आयुषात नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो.
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

गणेश अंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा || ganesh Angarki chaturthi wishes in marathi ||

अंगारकी चतुर्थी च्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा:

(११) वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:|
निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
सर्व गणेशभक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा.

(१२) गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया |
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(३) वंदितो तुज चरण आर्जव करतो
गणराया वरदहस्त असूद्या माथी
राहूद्या सदैव छत्रछाया
गणपती बाप्पा मोरया. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(४) श्री गणपतीच्या कृपेने प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कार्यात आपल्याला यश लाभो हीच सदिच्छा. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(५) बाप्पाच्या आशिर्वादानुसार संपत्ती आणि समृद्धीतले आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला मिळो. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

(६) बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होवो. अंगारकी संकष्टीच्या शुभ दिवशी तुमच्या कुटुंबातील सर्वांना सुख, समृद्धी आणि आनंद मिळो.

(७) श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(८) आपणास व आपल्या परिवाराला माझ्या कडून अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

(९) गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया! – अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!

(२०) अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा! तुमच्या मनातील इच्छित कामना श्री गणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना!

हे देखील पहा :

Leave a Comment