वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे || Vat Purnima Ukhane in Marathi ||

Vat Purnima Ukhane | Vat Purnima Ukhane in Marathi | Vat Purnima Ukhane Marathi | वटपौर्णिमा vat purnima ukhane in marathi | vat savitri vat purnima ukhane marathi | Vat Purnima Ukhane in Marathi for Female | वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे | Ukhane in Marathi |

वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस, _____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

वटपौर्णिमा (Vat Purnima)

Vat Purnima वटपौर्णिमा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा, हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो.हिंदू धर्मात साजरा केला जाणार हा सण धार्मिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे.

वटपौर्णिमाच्या दिवशी स्त्रिया हळद- कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पाच प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश,पंचामृत, हिरव्या बांगड्या इत्यादि सामग्री घेऊन वटवृक्षाची पूजा करून पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभवे व धनधान्य, मुले-बाळं, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी यावी अशी वटपौर्णिमेला प्रार्थना करतात.

हिंदू धर्मात साजरा केला जाणार हा सण धार्मिक तसेच पर्यावरणीय दृष्ट्याही विशेष महत्त्व आहे.

वटवृक्षाची पूजा केल्याने आणि त्याचे संवर्धन केल्याने पर्यावरणाचे रक्षण होते. वटवृक्षाचे अस्तित्व मातीची धूप थांबविण्यास, जलस्रोतांचे संरक्षण करण्यास, आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. म्हणूनच वटपौर्णिमा केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर पर्यावरणीय दृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे.

ह्या दिवशी वटवृक्षाच्या पूजेनंतर हळदी कुंकू ( हळदी कुंकू उखाणे ) करीता भरपूर बायका एकत्रित येतात व एकमेकांना वटपौर्णिमाच्या शुभेच्छा देतात. आणि आपल्या नवऱ्यासाठी उखाणे देखील घेतात.

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे (Vat Purnima Ukhane in Marathi)

तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी घ्या वटपौर्णिमा स्पेशल खास मराठी उखाणे किंवा हे उखाणे तुम्ही तुमच्या प्रियजणांच्यासोबत शेयर करा :

(१ )

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
_____ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

(२ )

सौभाग्यवतींसाठी आहे, वटपौर्णिमेचा सण मोठा,
_____ रावांचे नाव घेते, कधीही नको होउदे त्यांना तोटा.

(३ )

वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
_____ रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

(४ )

श्रावणात आकाशात पसरला, इंद्रधनुष्याच्या रंग,
_____ राव नेहमी सोबत असूदेत, माझ्या संग.

(५ )

कांजीवरम साडी, बनारसी खण,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.

(६ )

वडाची फांदी लावून, करते मी वृक्षारोपण,
_____ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन, मी परिवाराचे संगोपन.

(७ )

झाडे लावा झाडे जगवा, अशी मी करते आपल्याकडे मागणी,
_____ रावांचे नाव घेते, साथ जन्मी असूदेत, त्यांची मी साजणी.

(८ )

वटवृक्षाचे झाड लावून करूया, वटपौर्णिमा साजरी,
_____ राव म्हणतात, मी आहे फार लाजरी.

(९ )

पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
_____ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन.

(१० )

मराठी संस्कृतीची प्रतिमा, सावित्रेच्या निष्ठेचे दर्पण,
_____रावांसाठी करते मी, माझे जीवन अर्पण.

वट पौर्णिमा स्पेशल उखाणे || Vat Purnima Ukhane || Vat Purnima Special Ukhane ||

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे Vat Purnima Ukhane in Marathi

(११ )

वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

(१२ )

वडाची पूजा करते, ठेवुनी निर्मळ मन,
_____ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा सण.

(१३ )

आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

(१४ )

कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज
_____ चं नाव घेते वटपौर्णिमेचा सण आज.

(१५ )

तीन वर्षांतून एकदा येतो अधिकमास
_____ साठी आज केला वटपौर्णिमेचा उपवास.

(१६ )

झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
_____रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.

(१७ )

वडाच्या झाडाइतके, दीर्घायुष्य मिळो तुला,
_____ रावांचे नाव घेते, असेच प्रेम मिळूदे मला.

(१८ )

थाटात पार पडला, आज वटपौर्णिमेचा सोहळा,
_____रावांचे नाव ऐकण्यास, सर्वजण झाले गोळा.

(१९ )

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
_____रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.

(२० )

वटवृक्ष म्हणजे, निसर्गाचा अनमोल ठेवा,
_____ रावांची मी, आयुष्यभर करेन सेवा.

नवऱ्यासाठी वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे || Vat Purnima Special Ukhane For Husband In Marathi ||

(२१ )

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास
_____ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास.

(२ )

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान
_____ रावांसोबत, मी संसार करीन छान.

(२३ )

आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_____ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.

(२४ )

सृष्टीने जसे वडाचे झाड, वर्षानुवर्षे जपले,
_____ सुखी राहूद्या जन्मोजन्मी, असेच नाते अपुले.

(२५ )

वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ
_____ रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ.

(२६ )

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व
_____ रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व.

Vat Purnima Ukhana Marathi

(२७ )

अंलकारात अंलकार मंगळसूत्र मुख्य
_____ रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

(२८ )

वडाची पूजा आज मनोभावे करते
_____ रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

(२९ )

कुंकवाचा साज, असाच कायम राहू द्या,
_____ रावांना डोळे भरून, ७ जन्म पाहू द्या.

(३० )

कर्ता करविता परमेश्वर त्यावर टाकते मी भार
_____ रावांचे नाव घेते कर देवा संसाराची नौका पार.

स्त्रियांकारीता वट पौर्णिमा स्पेशल उखाणे (Vat Purnima Ukhane in Marathi for Female)

(३१ )

सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड,
_____ रावांची होती मला, कॉलेजपासून आवड.

(३२ )

लग्नानंतर वटपौर्णिमेचा, माझा पहिला आहे सण,
_____ रावांचे नाव घेते, ठेवून निर्मळ मन.

(३३ )

वटपौर्णिमेला व्रत ठेवायची, आहे प्रथा,
_____ रावांसोबत ऐकेन आज, वटसावित्रीची कथा.

(३४ )

श्रेया घोषाल, खूप सुंदर मराठी गाणी गाते,
_____ तुझ्यासवे सप्त जन्मीचे, होवो माझे नाते.

(३५ )

वटपौर्णिमा म्हणजे, साथ जन्माच्या गाठी,
_____ रावांची साथ भेटूदेत मला, सात जन्मासाठी.

(३६ )

पावसाच्या सुंदर वातावरणाने, सुखी आहेत पक्षी,
_____ रावांचे नाव घेते, तुम्ही आहात सर्वजण साक्षी.

(३७ )

हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,
आज वटपौर्णिमा आहे म्हणून, _____ रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका.

(३८ )

वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे,
_____ रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे.

मन.

(३९ )

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे, ५ फळे आणि फुले,
_____ रावांचे नाव घेते, वटसावित्रेच्या आशीर्वादाने झाली मला २ मुले.

(४० )

वडाची पूजा करते, आणि मागणे मागते सुखी राहूदे सृष्टी,
_____ रावांचे नाव घेते, देवा नेहमी असुदे आमच्यावर तुझी दृष्टी.

वट पौर्णिमा मराठी उखाणे || Ukhane in Marathi || वटपौर्णिमा || मराठी उखाणे ||

Vat Purnima Ukhane Marathi

(४१ )

देव आहे चोहीकडे, डोळे मिटून बघावे,
_____ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकावे.

(४२ )

वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
_____ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.

(४३ )

आज पहिलीच आहे, माझी वटपौर्णिमा,
_____ रावांशिवाय, एकही क्षण करमेना.

(४४ )

आज आहे माझी पहिली, वट सावित्री,
_____ रावांचे नाव घेते, होऊदेत त्यांची अखंड किर्ती.

(४५ )

पावसाची झाली सुरवात, आणि आज आहे पहिला सण,
वटवृक्ष बहरले तसेच, _____ रावांचे बहरूदे, नेहमी मन.

(४६ )

आज आहे वटपौर्णिमेचा सण,
_____ रावांचे सुखी राहूदेत तन, मन, धन.

(४७ )

वटवृक्षाच्या झाडाला, प्रदक्षिणा घातल्या सात,
_____ रावांचे नाव घेते, आपल्या सर्वांचे असुदे आमच्यावर हात.

(४८ )

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान,
_____ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

(४९ )

पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन,
_____ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन.

(५० )

तुटता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
_____ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे || Vat Purnima Ukhane in Marathi ||

(५१ )

दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा,
वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते _____रावांच्या नावाचा हिरवा चुडा.

(५२ )

संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा
_____ रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.

(५३ )

चांदणचाहूल होती, कोवळ्या पाऊली,
_____ रावांची सर्व इच्छा पूर्ण होवो, अशी मागणी करते मी तुझ्याकडे वटसावित्री माऊली.

(५४ )

सत्यवानाचे प्राण वाचवून, वाढविली सावित्रीने सर्वांची शान,
_____ रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.

(५५ )

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा मी करते, _____रावांना सुखमय जीवन आणि १०० वर्ष आयुष्य भेटूदे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते.

(५६ )

आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे , _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.

(५७ )

आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
_____ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

(५८ )

सर्व महिला जमल्या आज, म्हणून खेळूया काही गेम,
_____ रावांचे प्रेम राहूदे, आयुष्यभर माझ्यावर सेम.

(५९ )

गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती
_____ ला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला विनंती.

(६० )

वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
_____ चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा.

वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे || Vat Purnima Ukhane in Marathi || मराठी उखाणे || Marathi Ukhane ||

(६१ )

प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौणिमेची,
_____ रावांचे नाव घेते, सून _____ची.
(तुमचे आडनाव)

(६२ )

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
_____ रावांचं नाव घेते, _____ची सून.
(तुमचे आडनाव)

(६३ )

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र निघाला गगनात
_____ रावांचे नाव घेते, _____ च्या अंगणात.
(तुमचे आडनाव)

(६४ )

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेरची खून, _____ रावांचं नाव घेते, _____ची सून. (तुमचे आडनाव)

(६५ )

जीवनाला सुगंध असावा चंदनाचा
_____ चे नाव घेताना धागा जोडला प्रेमाच्या बंधनाचा.

(६६ )

आमच्या जोडीला, कोणाची नको लागावी नजर,
_____ रावांचे नाव घ्यायला, नेहमी मी हजर.

(६७ )

वटपौर्णिमेला सुहासिनी, पूजतात वड,
_____ रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत जड.

(६८ )

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत,
_____सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत.

(६९ )

वटपौर्णिमेला, फणसाची असते खूप मागणी,
_____ रावांची ७ जन्मासाठी, बनेल मी साजणी.

(७० )

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
_____ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

(७१ )

पोथी, पुराणे वाचून, बोध होतो मनाला,
_____ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सणाला.

(७२ )

वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
_____ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.

(७१ )

भरजरी साडीला जरतारी खण
_____ चं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण.

(७२ )

सागर तेथे सरिता, कवी तेथे कविता, _____ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

(७३ )

टपोरा मोगरा फुलला छान, _____रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान.

(७४ )

कळत नाही माझेच मला आहे स्वप्न कि भास, _____रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

(७५ )

सुहासिनींचा मेळा जमला, वटपौर्णिमेसाठी,
_____ रावांचे नाव घेऊन, निघाले मी वडाच्या पूजेसाठी.

हे देखील पहा :

1 thought on “वटपौर्णिमा स्पेशल मराठी उखाणे || Vat Purnima Ukhane in Marathi ||”

Leave a Comment