Haldi Kunku Special Marathi Ukhane || हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे ||

हळदी कुंकू: Haldi Kunku Special Marathi Ukhane

हळदी कुमकुम समारंभ हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांनी केली जाणारी विधी आहे. नवविवाहित वधू जेव्हा तिच्या नातेवाईकाच्या घरी जाते तेव्हा हळदी (हळद) आणि कुमकुम कपाळावर लाऊन साजरी केली जाते, आणि हा समारंभ अनेक भारतीय आणि हिंदू विवाहांचा एक महत्त्वाचा भाग आहे.


प्रत्येक पूजे मध्ये अथवा महिलांच्या कार्यक्रमामध्ये साजरा केला जाणारा कार्यक्रम आहे. हळदी कुंकू हा भारतीय स्त्रिया एकत्र येऊन साजरा केला जाणार मोठा कायर्क्रम असतो.


नवीन वर्षाची चांगली सुरवात हि हळद कुंकू लावून केली जाते.

हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे || Haldi kunku Special Marathi Ukhane ||

(१ )

हळदी कुंकवाला जमला,

सुवासिनींचा मेळ,

…..रावांचे नाव घेण्याची,हीच ती खरी वेळ.

(२ )

हळदी कुंकू आहे,

सौभाग्याची शान,

…..रावांना आहे,सोसायटी मध्ये खूप मान.

(३ )

हळदी कुंकूचे,

निमंत्रण आले काल,

…..रावांचे नाव घेऊन,

कुंकू लावते लाल.

(4)

हळदी कुंकू ला

आल्या साऱ्या महिला नटून,

…..रावांनी आणलेली साडी दिसते मला सर्वात उठून.

(५ )

कुंकू म्हणजे सौभाग्य

संसार म्हणजे खेळ,

…..रावांचे नाव घेते आज आहे

हळदी कुंकवाची वेळ.

(६ )

हळदीचा रंग आहे पिवळा,

आणि कुंकूचा लाल,

…..रावांच्या जिवनात,

आहे मी खुशहा

(७ )

हळदी कुंकूसाठी,

जमल्या साऱ्या बायका,

…..रावांचे नाव घेते,

सर्वांनी ऐका.

(८ )

कुंकू म्हणजे सौभाग्य

संसार म्हणजे खेळ,

…..रावांचे नाव घेते आज आहे

हळदी कुंकवाची वेळ.

(९ )

सृष्टी सौंदर्याच्या बागेला

चंद्र-सूर्य झाले माळी,

…..रावांचे नाव घेते,

हळदी-कुकुंवाच्या वेळी.

Haldi Kunku Special Marathi Ukhane || हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे ||

(१० )

वेळेचे काळचक्र फिरते

रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,

…..रावांचे नांव घेते आज आहे

हळदी कुंकवाचा दिवस.

(११ )

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,

…..रावांचं नाव घेते,

हळदी कुंकवाच्या दिवशी.

(१२ )

सासरे माझी मायाळू ,

सासू माझी हौशी,

…..रावांचे नाव घेते,

हळदी कुंकवाच्या दिवशी.

(१३ )

बागेची शोभा वाढवण्यासाठी

कष्ट करतो माळी,

…..रावांचे नाव घेते,

हळदीकुंकवाच्या वेळी.

(१४ )

हळदी कुंकू कागदाच्या पुड्यात,

…..रावांचं नाव घेते,

जाऊ बाईंच्या वाड्यात.

(१५ )

अक्षता पडताच,

अंतरपाट होतो दूर,

…..रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले,

सांगतात सनईचे सूर.

(१६ )

बकुळीचे फुल सुकले

तरी जात नाही सुगंध,

…..रावांसाठी माहेर सोडले

तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.

(१७ )

आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,

…. चे नाव घ्यायला

उखाणा कशाला हवा.

(१८ )

निरोगी आरोग्यासाठी

रोज फळे खावी ताजी,

……रावांसारखे पती मिळाले

हेच सौभाग्य माझे.

मराठी उखाणे || Marathi Ukhane || (Haldi kunku Special)

(१९ )

खूप पहिले तीर्थक्षेत्र

पवित्र वाटते काशी,

….. रावांचे नाव घेते

हळदी कुंकुवाच्या दिवशी.

(२० )

आकाशी चमकते तारे,

जमिनीवर चमकती हिरे,

…..राव हेच माझे अलंकार खरे.

(२१ )

सासरच्या कौतुकात

राहिले नाही काळाचे भान,

…..रावांचे नाव घेते

राखून सगळ्यांचा मान.

(२२ )

प्राणहीन भासे रासाचा रंग,

…..रावांचं नाव घेते

आणि सुरू करते,

हळदी कुंकवाचा आरंभ.

(२३ )

फुलांची वेणी गुंफतो माळी,

…..रावांचे नाव घेते

हळदी कुंकवाच्या वेळी.

(२४ )

साड्या घातल्या आहेत,

सर्वानी छान,

…..रावंच नाव घेते,

ठेवून सर्वांचा मान.

(२५ )

हळदी कुंकूला भेटतात,

महिलांना गिफ्ट,

…..रावांनी दिली होती मला,

लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट.

(२६ )

नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी,

…..राव जीवनात

…..ही गृहिणी.

(२७ )

भारत देश स्वतंत्र झाला,

१५ ऑगस्टच्या दिवशी,

…..रावांचे नाव घेते,

हळदी कुंकवाच्या दिवशी.

हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे || Haldi kunku Special Marathi Ukhane ||

(२8 )

जीवन म्हणजे

सुख-दुखांचा खेळ

… रावांचे नाव घेते

हळदी कुंकवाची झाली वेळ.

(२९ )

चांदीचे जोडवे पतीची खूण,

…. रावांचे नाव घेते

…. ची सून.

(३० )

पुरूष म्हणजे सागर,

स्त्री म्हणजे सरिता,

…..रावाचं नाव घेते

तुम्हां सर्वांकरिता.

(३१ )

आई ने केले संस्कार,

बाबांनी केले सक्षम,

…..सोबत असताना,

संसाराचा पाया होईल भक्कम.

(३२ )

भाव तेथे शब्द,

शब्द तेथे कविता

…..चे नाव घेते खास तुमच्या करिता.

(३३ )

वरळी वांद्रे लिंक

सी फेस आहे मुंबईची शान,

…..रावांचे नाव घेते राखते

तुमचा मान.

(३४ )

तुळशीसमोर काढते सुंदर रांगोळी,

…..रावांचं नाव घेते

हळदी कुंकवाच्या वेळी.

(३५ )

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात,

…..चे नाव घेते

माझ्या मनात.

(३६ )

चंदनी पानात मुग्ध कळी हसली,

…..रावांच्या प्रेमात

मी नकळत फसली.

हळदी कुंकू स्पेशल मराठी उखाणे || Haldi kunku Special Marathi Ukhane ||

(३७ )

गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी

…..चं नाव घेते आज हळदी कुंकवाच्या वेळी.

(३८ )

वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,कधी कधी पुनव कधी दिवस,

…..रावांचे नाव घेते,आज आहेहळदी कुंकुवाचा दिवस.

(३९)

सारंच गेलंय बदलून,

माझं नावही नव,

…..रावांनी दिल मला,

सर्वच जे हवं.

(४० )

पायात जोडवे हि पतीची खूण,

…..रावांचे नाव घेते रावांची सून.

(४१ )

श्रीकृष्ण रास खेळे,

गोपिकेच्या मेळी,

…..रावांचे नाव घेते,

हळदी कुंकवाच्या वेळी.

(४२)

वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस,

कधी कधी पुनव कधी दिवस,

…..रावांचे नाव घेते

आज आहे,हळदी कुंकुवाचा दिवस.

(४३ )

तुळजाभवानी मते वंदन करते तुला,

…..रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.

(४४ )

हिरव्या हिरव्या रानात,

चरत होते हरण,

….. रावांचे नाव घेते,

हळदी कुंकाचे कारण.

(४५ )

जळगाव फेमस आहे,

पिकवण्यासाठी केळी,

…..रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

(४६ )

तुळजाभवानी मते वंदन करते तुला,

…..रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला.

(४७ )

कान भरण्यात,

बायका आहेत हौशी,

…..रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

(४८ )

सर्व दागिन्यात,

श्रेष्ठ काळे मणी,

…..राव आहेत,

माझ्या कुंकवाचे धनी.

(४९ )

दिवाळी होती म्हणून,

बनवले करंजीचे सारण,

….. रावांचे नाव घेते,

हळदी कुंकूंचे कारण.

(५० )

दशरथ राजाने,

पुत्रासाठी केला नवस,

…..रावांचे नाव घेते,

आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

काही स्पेशल उखाणे:

Latest Marathi Ukhane for Female ( महिलांसाठी मराठी उखाणे )

Leave a Comment