Marathi Mhani Start from H || मराठी म्हणी व अर्थ. मराठी भाषेत बोलली जाणारी “ह” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“ह” मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from H (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Marathi Mhani Start from H
“हत्ती गेला पण शेपूट राहिले.”
अर्थ: कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला.
Meaning Of “हत्ती गेला पण शेपूट राहिले.” = Most of the work is done and only a little remains.
“हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते.”
अर्थ: जेथे भलेभले हात टेकतात तेथे साधारण कोणी बाजी मारतो.
Meaning Of “हत्ती बुडतो अन् शेळी ठाव मागते.” = Where good hands are extended, there an ordinary person tries to outdo others.
“हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा.”
अर्थ: मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे.
Meaning Of “हत्तीच्या दाढे मध्ये मिऱ्याचा दाणा.” = Take very small measures when big measures are needed.
“हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते.”
अर्थ: आजार, संकटे येतात ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात.
Meaning Of “हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते.” = Illnesses, calamities come early and in large numbers but gradually diminish as they recede.
“हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.”
अर्थ: परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसर्याला देणे स्वतःला झीज लागू न देणे.
Meaning Of “हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.” = Giving another’s thing to a third is not to let oneself wear and tear.
“हाजिर तो वजीर.”
अर्थ: जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो,
प्रथम हजर राहणाऱ्याला चांगला लाभ मिळतो.
Meaning Of “हाजिर तो वजीर.” = First comer gets good advantage.
“हात ओला तर मित्र भला.”
अर्थ: म्हणजेच तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात.
Meaning Of “हात ओला तर मित्र भला.” = if there is any benefit to be gained from you, people will praise your virtues.
“हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.”
अर्थ: उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते.
Meaning Of “हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.” = Wealth grows in the home of an industrious man.
“हात दाखवून अवलक्षण.”
अर्थ: आपणहून ओढून घेतलेले संकट.
Meaning Of “हात दाखवून अवलक्षण.” = A crisis brought on by ourselves.
“हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे.”
अर्थ: जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे.
Meaning Of “हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे.” = Letting go of what we have in our hands in hopes of finding something better.
“हातच्या काकणाला आरसा कशाला.”
अर्थ: स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.
Meaning Of “हातच्या काकणाला आरसा कशाला.” = Do not provide proof for clear matters.
“हिरा तो हिरा गार तो गार.”
अर्थ: गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्यावाचून राहत नाहीत.
Meaning Of “हिरा तो हिरा गार तो गार.” = The qualities of a virtuous person do not remain hidden for long.
“हिऱ्या पोटी गारगोटी.”
अर्थ: चांगल्या च्या पोटी वाईट गोष्टी होणे.
Meaning Of “हिऱ्या पोटी गारगोटी.” = Bad things happen with good person.
“हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा.”
अर्थ: खोटे अश्रू ढाळणे.
Meaning Of “हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांच्या पावसाळा.” = shed fake tears.
“होळी जळाली आणि थंडी पळाली.”
अर्थ: होळीनंतर थंडी कमी होते.
Meaning Of “होळी जळाली आणि थंडी पळाली.” = After Holi, the cold reduced.
Marathi Mhani Start from H च्या या पोस्ट मध्ये आम्ही “ह” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या “ह” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.