गौरी – गणपती दर्शनाचे आमंत्रण || Ganesh Chaturthi Invitation in Marathi ||

Ganesh Chaturthi Invitation in Marathi | Whatsapp, Text, Sms | गणपती दर्शनाचे आमंत्रण संदेश |

चला, आपण आशीर्वाद घेऊया, आनंद वाटूया आणि विघ्नहर्त्याच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव घेऊया.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी म्हणजे, आनंद, भक्ती आणि एकोप्याचा सण, गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते. ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत जेव्हा आपण आपल्या मनात आणि घरात गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून स्थापन करतो.

ह्या शुभ प्रसंगी, आपण आपल्या मित्र-परिवारास घरी गणपती दर्शनासाठी आमंत्रण देत असतो. त्या साठी हे गौरी – गणपती दर्शनाचे आमंत्रण Gauri Ganpati Invitation Messages in marathi उपयोगी येतात.

चला, आपण आशीर्वाद घेऊया, आनंद वाटूया आणि विघ्नहर्त्याच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव घेऊया.

गौरी – गणपती दर्शनाचे आमंत्रण || Ganesh Chaturthi Invitation in Marathi ||

हे आमंत्रण संदेश तुम्ही सहज Whatsapp, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या मित्र-परिवारास सहज पाठवू शकतात.

(१ ) || श्री गणेशाय नम ||

आपणांस आग्रहपूर्वक आमंत्रण,
आमच्या घरी प्रथमच गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, आणि या आनंददायी प्रसंगासाठी आपले उपस्थितीत आम्हाला आनंद वाटेल. आपण आपल्या कुटुंबासह या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे, ही विनंती.

(२ ) आग्रहाचं आमंत्रण,
आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्या घरी श्री गणेशाचे _सप्टेंबर ते _ सप्टेंबर रोजी आगमन होणार आहे.तरी आपण सर्वांनी सहकुटुंब दर्शनाला यावे.
गौरी पूजन –
पत्ता-
वेळ:

(३ ) नक्की या, आग्रहाचं निमंत्रण !!!
आपणांस आग्रहपूर्वक आमंत्रण देत आहे की, आमच्या घरी आपण सहकुटुंब, सहपरिवार गणपती बाप्पाच्या दर्शनास यावं. आपली उपस्थिती आम्हासाठी अनमोल आहे.
पत्ता-

(४ ) गणपती बाप्पा मोरया!

दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे ०७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२४ या पाच दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब – सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण.

(५ ) सस्नेह निमंत्रण..!सालाबादाप्रमाणे यंदाही बाप्पाचं आगमन आमच्या घरी दि. ०७/०९/२०२४ होत आहे. तरी या आनंदसोहळ्या प्रसंगी आपण आपल्या संपूर्ण परिवार व आप्तेष्टांसोबत आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्यासाठी जरुर यावे, ही नम्र विनंती. पत्ता:- आम्ही आपली वाट पाहत आहोत.

Ganesh Chaturthi Invitation in Marathi (गणपती दर्शनाचे आमंत्रण)

(६ )॥ श्री गणेशाय नम:॥
वर्षभरातून एकदा आमच्या घरी येणार्‍या गणरायाच्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आपणास श्री आणि सौ यांसकङून आग्रहाचे निमंत्रण…
पत्ता—
तारीख,वेळ
कार्यक्रम नियोजन
_ सप्टेंबर 20_ , सकाळी __ वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठा

(७ ) गणेशोत्सव २०२४ आग्रहाचं आमंत्रण..! सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या घरी शनिवार, दिनांक ०७/०९/२०२४ या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा!

(८ ) नक्की या, आग्रहाचे आमंत्रण,
आमच्या येथे सालाबादप्रमाणे यंदाही गौरी – गणपतीचे आगमन होणार आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.

(९ ) आग्रहाचं आमंत्रण, सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी दिनांक ७ सप्टेंबर२०२४ रोजी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा.

(१० ) नक्की या, आग्रहाचं निमंत्रण !!!
आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, यंदाही आमच्या घरी श्रीगणेश चतुर्थीला शनिवार दिनांक – ७/०९/२०२४ रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा. आपले नम्र, ठिकाण :

Ganesh Chaturthi Invitation in Marathi

गणपती दर्शनाचे आग्रहाचे आमंत्रण. | Ganesh Darshan Invitation |

आपल्या मित्र -परिवारासह दया गणपती दर्शनाचे आग्रहाचे आमंत्रण (text message ganesh chaturthi invitation)

(११ )दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमच्याकडे दिनांक ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर 20२४ या पाच दिवसांसाठी बाप्पाचे आगमन होणार आहे. गौराईचे आगमन: __ सप्टेंबर ते __ सप्टेंबर 20__ तरी आपण सर्वांनी सहकुटूंब-सहपरिवार बाप्पाच्या दर्शनासाठी यावे असे आग्रहाचे आमंत्रण निमंत्रक: पत्ता: गणपती बाप्पा मोरया

(१२ )नमस्कार मित्रांनो!!
काय मग?
बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत busy ना!…मोदक,आरास,आणि काय काय… लगबग सगळीकडे असंच उत्साहाचं वातावरण… म्हणूनच यंदाही आमच्याकडे बाप्पा उंदरावरून स्वार होऊन येणार आहे… काय म्हणताय किती दिवस ?दीड दिवस हो!!
दिनांक _ सप्टेंबर ते _ सप्टेंबर…या दिवसात पण मज्जा,उत्साह, धम्माल,आणि मोदकांचा आस्वाद बाप्पाबरोबर घेण्यासाठी येताय ना ?!
पत्ता?शोधलं की सापडतं.

(१३ ) सस्नेह निमंत्रण..!

सालाबादप्रमाणे यंदाही आमच्या कडे _ ऑगस्टला गणरायाचं आणि _ सप्टेंबरला गौराईचं आगमन होणार आहे. तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण ! गौरी पूजन – तारीख : _ ऑगस्ट, २०_ वेळ: सकाळी __ वाजल्यापासून पत्ता-

हे गौरी – गणपती दर्शनाचे आग्रहाचे आमंत्रण (Gauri Ganpati Invitation Messages in Marathi) या आध्यात्मिक वातावरणात अधिक भर घालेल आणि हे सेलिब्रेशन अधिक संस्मरणीय बनवेल.

Leave a Comment