Independence Day Wishes In Marathi || स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी ||

Independence Day Wishes in Marathi | स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी | Happy Independence Day Wishes | स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा |

धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा, घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातंत्र्य दिन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवशाली इतिहासाची आणि स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या बलिदानाची आठवण जपण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी प्रत्येक देशवासीय आपला प्रियजनांना-मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात.

Independence Day Wishes In Marathi || स्वतंत्रता दिवस शुभेच्छा मराठी ||

(१ ) धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा, घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) हजारो लोकांनी देशासाठी आपला जीव दिला, म्हणून आपला देश आज श्वास घेत आहे. त्यांचा त्याग कधीही विसरू नका. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) विविधतेतील एकता या देशाची शान आहे, म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.

(५ ) सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…सर्व जगात प्रिय देश आपुला.

(६ ) दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(७ ) देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

(८ ) ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

(९ ) ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता, सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा, तोच आहे भारत देश आमचा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(१० ) सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली, जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा || Happy Independence Day Wishes In Marathi ||

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या खास शुभेच्छा तुम्ही Message, Text Message, Sms, संदेश, आपला प्रियजनांना सोबत (Independence Day Wishes In Marathi) Whatsapp, social media द्वारे पाठवा शकतात.

(११ ) भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा आणि विविधता जपणार्‍या एकात्मतेचा, सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

(१२ ) कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(१३ ) वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर, देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(१४ ) देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी, हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे, ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(१५ ) ना धर्माच्या नावावर जगा ना, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे या देशाचा, फक्त देशासाठी जगा. स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

(१६ ) मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

(१७ ) तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या आनंददायी शुभेच्छा. तुमचा दिवस देशभक्तीच्या भावनेने भरलेला जावो!

(१८ ) तुम्हाला २०२४ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा! तिरंगा सदैव उंच फडकत राहो आणि आपला देश समृद्ध होत राहो.

(१९ ) निशान फडकत राही निशाण झळकत राही, देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) जिंकावे वा कटून मरावं हेंच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेंच आम्हाला ठावं, देशापायी सारी इसरू माया ममता नाती, देव देश अन् धर्मापायीं प्राण घेतलं हातीं.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा || happy independence day 2024 ||

Independence Day Wishes

(२१ ) जगभरात घुमतोय भारताचा नारा चमकतोय आकाशात तिरंगा आपला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२२ ) जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो तो माझा भारत देश आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२३ ) ना हिंदू, ना मुस्लीम फक्त माणूस बना माणूस. वंदे मातरम, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

(२४ ) विकासाचा उत्तम मार्ग म्हणजे स्वातंत्र्याचा मार्ग. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२५ ) विचारांचं स्वातंत्र्य विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा, चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२६ ) रुप, रंग, वेष, भाषा जरी आहेत अनेक तरी आम्ही सारे भारतीय आहोत एक. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

(२७ ) जर मला पुन्हा या जगात जन्म घेण्याची संधी दिली गेली तर मी पुन्हा या महान राष्ट्राची निवड करीन. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

(२८ ) जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

(२९ ) मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी राने वने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३० ) या स्वातंत्र्यदिनी आपल्या महान राष्ट्राची शांती आणि ऐक्य जपण्यासाठी प्रतिज्ञा घेऊया. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Independence Day Wishes || स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

(३१ ) दे सलामी.. या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझ्यात प्राण आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(३२ ) देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

(३३ ) हुतात्म्यांना त्यांच्या बलिदानांसाठी अभिवादन करूया आणि आम्हाला आमचे स्वातंत्र्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू या.

(३४ ) ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, वंदे मातरम्!

(३५ ) वाऱ्यामुळे नाही भारतीय सैनिकांच्या श्वासामुळे फडकतोय आपला तिरंगा…! स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!

(३६ ) स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम, त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३७ ) रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३८ ) पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा, अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा, मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा.. ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!

(३९ ) देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो, भारतीय आहोत आम्ही. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(४० ) तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने तिरंगा. ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, जय हिंद!

Leave a Comment