Kojagiri Purnima Wishes In Marathi | Kojagiri Purnima | Kojagiri Purnima Wishes | Wishes | Wishes In Marathi | Sharad Purnima | Kojagiri | Sharad Purnima Wishes |
दूध केशरी, चंद्र – चांदणे, कोजागिरीचे रूप आगळे…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)
“कोजागिरी” हा शब्द “को जागर्ती” म्हणजे “कोण जागे आहे?” या शब्दातून आला आहे. कोजागिरी पौर्णिमेला, ज्याला शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते, प्राचीन मान्यतेनुसार, या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरतात आणि ज्या लोकांनी जागरण केले आहे, प्रार्थना केली आहे किंवा शुभ कार्यात सहभागी झाले आहेत, त्यांना आशीर्वाद देतात. म्हणून या रात्री देवीच्या आशीर्वादासाठी जागरण करणे हे महत्त्वाचे मानले जाते.
याचबरोबर, या रात्रीच्या चंद्रकिरणांमध्ये अमृताचा वर्षाव होत असल्याची एक पौराणिक मान्यता आहे. असे मानले जाते की या अमृताच्या किरणांमुळे वातावरणात आरोग्यवर्धक आणि पोषक शक्ती येतात. बरेच लोक या रात्री दूध किंवा खीर तयार करून चंद्रप्रकाशात ठेवतात, ज्यामुळे ती खीर चंद्राच्या ऊर्जा शोषून अधिक पोषक होते, असे मानले जाते.
कृष्ण परंपरेनुसार: या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपींसोबत “रासलीला” केली, ज्यामध्ये प्रेम आणि आत्म्याचे परमेश्वराशी असलेले दिव्य नाते दर्शवले जाते.ही रात्र प्रकाशाचा अंधारावर विजय दर्शवते आणि आरोग्य, संपत्ती आणि आनंदाच्या आशीर्वादांचे प्रतीक मानली जाते.
Kojagiri Purnima Wishes In Marathi || कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा ||
ह्या कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश तुम्ही सहज Whatsapp, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना पाठवू शकतात.
(१ ) चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी, कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!.
(२ ) चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो, पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(३ ) मंद गतीने पाऊलं उचलत, चांदण्याचा प्रवास सुरू झाला, दडला होता ढगात हा चंद्र, पदरात जसा मुख चंद्रर लपलेला…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(४ ) चांदण्याच्या या शुभ रात्रीत, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. तुमचं जीवन सुख, शांती आणि भरभराटीने उजळो! शरद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(५ ) कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(६ ) कोजागिरीच्या चांदण्या रात्री, पूर्ण चंद्रप्रकाशाच्या सानिध्यात, केशरबदाम मिश्रित आटीव दुधाचा आस्वाद घेणे… म्हणजे खरे सुख…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(७ ) कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात, चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात, मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(८ ) दूध हे केशरी, कोजागिरीचे खास, वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात, परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात असाच वाढावा गोडवा आणि आयुष्यभर मिळावी आपली साथ… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(९ ) आजचा दिवस तुमच्यासाठी सुखकारक आणि आनंददायक असावा हिच सदिच्छा… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१० ) मावळतीची घाई झाली सूर्यास, कारण आज चमकण्यास आला आहे, कोजागिरीचा चंद्र नभात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा शुभेच्छा (Kojagiri Purnima Wishes)
कोजागिरी पौर्णिमा / शरद पौर्णिमा शुभेच्छा नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना द्या Kojagiri Purnima Wishes In Marathi:
(११ ) चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो हिच आजच्या दिवशी प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१२ ) कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला, दीर्घायुष्य देणारी, सुखशांतीसमाधान आणि समृद्धीची भरभराट करणारी ठरो हिच प्रार्थना… कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१३ ) विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हासणारा तो चंद्रमा पाहा रे, असतो नभात रोज तो एकटाच रात्री पण आजच्या निशेला त्याच्या सवे राहा रे. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(१४ ) शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र, चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र, दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे, आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१५ ) चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(१६ ) मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(१७ ) आली कोजागिरी पौर्णिमा, शरदाचे चांदणे घेऊन, कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन, कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
(१८ ) आकाशगंगा तेजोमय झाली, नभात चंद्रफुलांची उधळण झाली, कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतूर झाली…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(१९ ) कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माझ्या संपूर्ण परिवाराकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा!
(२० ) कोजागिरी म्हणजे क्षण आनंदाचा, उत्साहाचा आणि वैभवसंपन्नेचा…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा || Kojagiri Purnima Wishes In Marathi ||
(२१ ) चंद्राचा नूर आज दिसेल खूप खास, कारण… कोजागिरीची रात्र आहे आज…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(२२ ) प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू हा सण कोजागिरीचा…कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(२३ ) साखरेचा गोडवा केशरी दुधात, विरघळला तुझ्या माझ्या नात्यात, रेंगाळत राहो अंतर्मनात, स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
(२४ ) कोजागिरीची रात्री लखलखते, दुधात देखण्या चंद्राचे रूप दिसते….अशा या शरद पौर्णिमेला तुमची आमची साथ लाभते….कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२५ ) जागूनी रात्र आज, घेऊ या माता महालक्ष्मीचा आर्शीवाद …कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२६ ) कोजागिरीच्या रात्री, क्षीर किरणांच्या सरी, आल्या नाचत भूवरी आज असे कोजागिरी. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(२७ ) शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा, सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा..ही कोजागिरी पौर्णिमा तुम्हाला, दीर्घायुष्य देणारी, सुखशांतीसमाधान आणि समृद्धीची भरभराट करणारी ठरो हिच प्रार्थना…कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
(२८ ) कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… हिच आमची मनोकामना…कोजागिरी पौर्मिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(२९ ) मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते, जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते…कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
(३० ) कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!