Navratri Colours 2024 || २०२४ नवरात्री रंग आणि महत्त्व ||

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते

नवरात्री:

– नवचेतना देणारी
– विघ्नांचा नाश करणारी
रा – राजसी मुद्रा असलेली
त्री– तिन्ही त्रिभूवनी वास करणारी

माता दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यात झालेल्या युद्धात दुर्गा माताने त्याचा वध करून जगाचे कल्याण केले, वाईटावर चांगल्याचा विजय हे दर्शवणारा आणि देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना समर्पित हा सण आहे.

भक्त देवी दुर्गा मातेची पूजा-अर्चना, घटस्थापना करतात, देवीच्या मूर्तीची स्थापना करून नऊ दिवस मनोभावे पूजा-भक्ति करुण मोठ्या धूमधडाक्यात तर कुठे भक्त उपवास-व्रत, जागरण, कीर्तन, कन्यापूजा, हवन इत्यादी धार्मिक विधी करुण नवरात्री साजरी करतात, विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.

शारदीय नवरात्रोत्सवास यंदा 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवास ‘शारदीय नवरात्रोत्सव’ असे म्हणतात.

२०२४ नवरात्री ९ रंग (Navratri Colours 2024 List)

Navratri colours 2024

३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२४ नवरात्री ९ दिवस रंग यादी:

Navratri Colours 2024 List

देवीची नऊ रूपे कोणती.

  • १. शैलपुत्री,
  • २. ब्रह्मचारिणी
  • ३. चन्द्रघंटा
  • ४. कूष्मांडी (किंवा कुष्मांडी)
  • ५. स्कंदमाता
  • ६. कात्यायनी
  • ७. कालरात्री
  • ८. महागौरी
  • ९. सिद्धिदात्री

नवरात्रीच्या दिवसांचे रंग कसे ठरवले जातात?

नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे.

उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल. या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत.

बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.

नवरात्रीच्या प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे. (Navratri Colours 2024)

  • पिवळा – आनंद, चमक आणि ऊर्जा दर्शवते.
  • हिरवा – वाढ, सुसंवाद आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे.
  • राखाडी – स्थिरता आणि सामर्थ्य प्रतिबिंबित करते.
  • केशरी – उत्साह, उबदारपणा आणि ऊर्जा दर्शवते.
  • पांढरा – शांतता आणि शुद्धतेचे प्रतीक आहे.
  • लाल – शक्ती आणि उत्कटतेचा रंग,
  • रॉयल ब्लू – राजेशाही, अभिजातता आणि संपत्ती दर्शवते .
  • गुलाबी – करुणा, सुसंवाद आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
  • जांभळा – अध्यात्म, महत्त्वाकांक्षा आणि समृद्धी प्रतिबिंबित करते.

नवरात्रीचे रंग सामाजिक उत्सवांमध्ये महत्त्वाचे स्थान घेतात. महाराष्ट्रात, हे रंग फक्त धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक कार्यक्रमांमध्येही पाळले जातात, जसे की गरबा किंवा दांडिया नृत्य. दिलेल्या दिवशी विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केल्याने सहभागी लोकांमध्ये एकता आणि भक्तीची भावना निर्माण होते.

हे देखील पहा :

Leave a Comment