CrowdStrike
CrowdStrike बद्दल थोडे अधिक समजून घ्यायचं झाल्यास, ही एक सायबरसिक्योरिटी कंपनी आहे. जी क्लाउड-डिलिव्हर्ड एंडपॉइंट प्रोटेक्शन सोल्यूशन्स पुरवते.
त्यांच्या प्रसिद्ध “Falcon” प्लॅटफॉर्मच्या मदतीने, कंपनी एंटरप्राइझसाठी रिअल-टाइम थ्रेट इंटेलिजेंस, इन्शिडंट रिस्पॉन्स, आणि अॅडव्हान्सड थ्रेट हंटिंग सोल्यूशन्स प्रदान करते.
CrowdStrike चा असा दावा आहे की, कंपनीचे तंत्रज्ञान 99% मालवेअर धोके तुमच्या ऑर्गेनाइजेशन किंवा पर्सनल डिवाइसवर प्रभाव टाकण्यापासून 99% थांबवू शकते.
(CrowdStrike Windows Outage) आउटेज म्हणजे काय ?
क्राउडस्ट्राइक आउटेज म्हणजे त्यांची पायाभूत सुविधा किंवा प्रणाली अयशस्वी झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सेवा देणे थांबवावे लागते.
ही समस्या का निर्माण झाली होती ?
CrowdStrike Falcon सेन्सर उत्पादनातील दोषपूर्ण फाइलमुळे ही समस्या निर्माण झाली होती, सायबर हल्ल्यामुळे नव्हे, असे CrowdStrike सीईओ जॉर्ज कुर्ट्झ George Kurtz यांनी पुष्टी केली
समस्या कोणती ?
Windows Outage समस्या चे कारण दोषपूर्ण सॉफ्टवेअर अपडेट ( दोषपूर्ण फाइल ) आहे.
समस्या = BSOD ब्लू स्क्रीन ऑफ डेथ.
BSOD म्हणजे “ब्लू स्क्रीन ऑफ डेथ,” ही एक गंभीर प्रणाली त्रुटी आहे जी Windows ऑपरेटिंग सिस्टमवर येते. जेव्हा प्रणाली एका गंभीर त्रुटीला सामोरे जाते आणि सुरक्षितपणे पुनर्प्राप्त होऊ शकत नाही, तेव्हा ती वापरकर्त्यांना त्रुटी संदेशासह एक निळा स्क्रीन दाखवते आणि सिस्टमला रीस्टार्ट करते.
BSOD Error ची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
- हार्डवेअर समस्या:
- सॉफ्टवेअर समस्या:
- मेमरी समस्यां:
Windows Outage ची समस्या सोडवले गेले का?
ही समस्या ओळखली गेली आहे, वेगळी केली गेली आहे आणि निराकरण करण्यात आले आहे.
या आउटेजचा परीणाम कोणावर झाला ?
CrowdStrike कंपनीशी संबंधित असलेल्या Microsoft 365 App वर अवलंबून असलेल्या जगभरातील बँका, विमान कंपन्या, टेलिव्हिजन नेटवर्क आणि आरोग्य प्रणालींना व्यापक आउटेजचा फटका बसला.
हजारो उड्डाणे आणि ट्रेन सेवा जागतिक स्तरावर रद्द केल्या गेल्या, ज्यामध्ये यू.एस. मधील १,८०० पेक्षा अधिक उड्डाणांचा समावेश आहे, आणि इतर अनेक सार्वजनिक आणि किरकोळ सेवा विस्कळीत झाल्या.
या आउटेजमुळे केवळ भारत नाही तर ऑस्ट्रेलिया, जपान आणि इतर देशांतील लोकांनाही अनेक अडचणीना सामोरे जावे लागले.
इतकंच नाही तर या जमुळे भारतातील अनेक शेयर मार्केट प्लेयर्स, फ्लाइट ऑपरेटर आणि न्यूज ऑर्गेनाइजेशन्स देखील प्रभावित झाले.
BSOD Error | BSOD Error ची कारणे | BSOD ब्लू स्क्रीन ऑफ डेथ | CrowdStrike | Windows Outage | Falcon | George Kurtz | Microsoft 365 | Microsoft Windows | BSOD |