मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ” म्हणी ” या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: || Mhani in Marathi ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?
” इच्छा तेथे मार्ग.”
अर्थ: एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.
Meaning Of ” इच्छा तेथे मार्ग.”=If you want to do something, there is a way.
” इच्छा परा ते येई घरा.”
अर्थ: आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.
Meaning Of ” इच्छा परा ते येई घरा.”=What we are concerned about in others is to come to us.
” ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.”
अर्थ: जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.
Meaning Of ” ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.” =As soon as one is born, one is nurtured.
” इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते.”
अर्थ: इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.
Meaning Of” इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते.”=If everything happened as desired, all the people would have become rich.
” इन मीन साडेतीन.”
अर्थ: एखाद्या कामासाठी कमीत कमी लोक हजर असणे.
Meaning Of” इन मीन साडेतीन.”=Minimum number of people present for a task.
” इकडे आड तिकडे विहीर.”
अर्थ: दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे.
Meaning Of” इकडे आड तिकडे विहीर.”=Having a difficult situation on both sides.
” उठता लाथ बसता बुकी.”
अर्थ: प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे.
Meaning Of” उठता लाथ बसता बुकी.”=Repeatedly punishing each deed to create an argument.
” उडत्या पाखराची पिसे मोजणे.”
अर्थ: अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे.
Meaning Of” उडत्या पाखराची पिसे मोजणे.”=Examining the difficult very easily.
” उधारीचे पोते सव्वाहात रिते.”
अर्थ: उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो.
Meaning Of” उधारीचे पोते सव्वाहात रिते.”=There is always a loss in what is borrowed.
” उंदराला मांजर साक्ष.”
अर्थ: वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
Meaning Of” उंदराला मांजर साक्ष.”=Witnessing each other in doing evil.
” उचलली जीभलावली टाळ्याला.”
अर्थ: विचार न करता बोलणे.
Meaning Of” उचलली जीभ लावली टाळ्याला.”=Speaking without thinking.
” उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.”
अर्थ: प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे.
Meaning Of” उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.”=At times it would be ridiculous to show rashness of hope.
” उथळ पाण्याला खळखळाट.”
अर्थ: फार थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो.
Meaning Of” उथळ पाण्याला खळखळाट.”=A man with very little virtue dies proud.
” उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.”
अर्थ: कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.
Meaning Of” उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.”=Do not take advantage of any good thing or someone’s goodness.
” एक ना घड भारभर चिंध्या.”
अर्थ: एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.
Meaning Of” एक ना घड भारभर चिंध्या.”=When many tasks are done at the same time, all the tasks become meaningless.
” एका माळेचे मणी.”
अर्थ: सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे .
Meaning Of” एका माळेचे मणी.”=All people have the same nature.
” एका हाताने टाळी वाजत नाही.”
अर्थ: दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
Meaning Of” एका हाताने टाळी वाजत नाही.”=A quarrel between two cannot be blamed solely on one or both are guilty of an act.
” एन केन प्रकारेण.”
अर्थ: योग्य अयोग्य किंवा चांगल्या वाईट असा विचार न करता कोणताही भलाबुरा मार्ग अवलंबणे.
Meaning Of ” एन केन प्रकारेण.”=To follow any good path without thinking about right or wrong or good or bad.
” एक घाव दोन तुकडे.”
अर्थ: कोणतेही प्रकरण चिघळत न ठेवता झटकन निर्णय घेणे.
Meaning Of ” एक घाव दोन तुकडे.”=Taking quick decisions without aggravating any matter.
” एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.”
अर्थ: दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत.
Meaning Of” एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत.”=Two bright people cannot live happily together, two savants cannot live happily in the same house.
” ऐंशी तेथे पंचाऐंशी.”
अर्थ: अतिशय उधळेपणाची कृती.
Meaning Of ” ऐंशी तेथे पंचाऐंशी.”=A very extravagant act.
” ऐकावे जनाचे करावे मनाचे.”
अर्थ: लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
Meaning Of” ऐकावे जनाचे करावे मनाचे.”=Listen to people and then do what you think is right.