मराठी म्हणी व त्यांचे अर्थ || Marathi Mhani Aani Arth ||

मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ” म्हणी ” या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.”

अर्थ: स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.

Meaning Of“अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.”=Instead of admitting one’s fault, blaming others for it.

“अडला हरी गाढवाचे पाय धरी.”

अर्थ: एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

Meaning Of ” अडला हरी गाढवाचे पाय धरी =Even a wise man has to plead with a fool in times of trouble.

” अति शहाणा त्याचा बैल रिकामा.

अर्थ: जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.

Meaning Of ” अति शहाणा त्याचा बैल रिकामा.=The man who goes to do much wisdom. It doesn’t work at all.

” अंथरूण पाहून पाय पसरावे.”

अर्थ: आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

Meaning Of ” अंथरूण पाहून पाय पसरावे.=Keep the expenses as per your ability.

असतील शिते तर जमतील भुते.”

अर्थ: एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.

Meaning Of ” असतील शिते तर जमतील भुते.=If a person benefits, people gather around him.

आवळा देऊन कोहळा काढणे.”

अर्थ: 1)आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
2)क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.

Meaning Of आवळा देऊन कोहळा काढणे.” = Giving false hope and then disappointing or Making a big profit out of a small thing.


आयत्या बिळावर नागोबा.”

अर्थ: एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

Meaning Of आयत्या बिळावर नागोबा.”= Having a tendency to take advantage of what one has done for oneself.


आपलेच दात आपलेच ओठ.”

अर्थ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

Meaning Of आपलेच दात आपलेच ओठ.”= One’s own teeth, one’s own lips.


आलिया भोगासी असावे सादर.”

अर्थ: तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

Meaning Of आलिया भोगासी असावे सादर.”= Accepting the situation that has created complaints and grumbles.


आयजीच्या जीवावर बायजी उदार.”

अर्थ: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

Meaning Of आयजीच्या जीवावर बायजी उदार.” = Showing generosity by spending someone else’s money.


” आपल्याच पोळीवर तूप ओढणे.”

अर्थ: फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

Meaning Of ” आपल्याच पोळीवर तूप ओढणे.”= Just to get that much benefit for yourself.

आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.”

अर्थ: अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

Meaning Of आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.”=Gain more than expected.

आपला हात जगन्नाथ.”

अर्थ: आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

Meaning Of आपला हात जगन्नाथ.”=Our progress depends on our performance.

आईचा काळ बायकोचा मवाळ.”

अर्थ: आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा.

Meaning Of आईचा काळ बायकोचा मवाळ.”=Cares for his wife while neglecting his mother.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.”

अर्थ: मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.

Meaning Of आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.”=Basically creating a condition conducive to the lazy attitude of a lazy person.

आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली.”

अर्थ: अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.

Meaning Of आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली.”=Extremely silly exaggeration.

आधी शिदोरी मग जेजूरी.”

अर्थ: आधी भोजन मग देवपूजा.

Meaning Of आधी शिदोरी मग जेजूरी.”=First food then worship

आचार भ्रष्टी सदा कष्टी.”

अर्थ: ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.

Meaning Of आचार भ्रष्टी सदा कष्टी.”=Whose morals are not good. He is always sad.

आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.”

अर्थ: एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

Meaning Of आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.”=One should work and others should benefit from it.

” आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं.”

अर्थ: स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.

Meaning Of ” आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं.”=Having a tendency towards good in oneself and bad in others.

” अळी मिळी गुप चिळी.”

अर्थ: रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.

Meaning Of ” अळी मिळी गुप चिळी.”=Everyone had to swallow the beans so as not to reveal the secret.

” अहो रूपम अहो ध्वनी.”

अर्थ: एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.

Meaning Of ” अहो रूपम अहो ध्वनी.”=Giving false praise to one another without showing one another’s limits.

आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.”

अर्थ: ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.

Meaning Of आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.”=A fault for which we laugh at another. The same fault lies with us.

अचाट खाणे मसणात जाणे.”

अर्थ: खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.

Meaning Of अचाट खाणे मसणात जाणे.”=If there is excess in food and drink, the result is bad.

ओळखीचा चोर जीवे न सोडी.”

अर्थ: ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.

Meaning Of ओळखीचा चोर जीवे न सोडी. =A known enemy is more dangerous than an unknown enemy.

Leave a Comment