मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ” म्हणी ” या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?
“अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.”
अर्थ: स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
Meaning Of“अगं अगं म्हशी मला कोठे नेशी.”=Instead of admitting one’s fault, blaming others for it.
“अडला हरी गाढवाचे पाय धरी.”
अर्थ: एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
Meaning Of ” अडला हरी गाढवाचे पाय धरी “=Even a wise man has to plead with a fool in times of trouble.
” अति शहाणा त्याचा बैल रिकामा.“
अर्थ: जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.
Meaning Of ” अति शहाणा त्याचा बैल रिकामा.“=The man who goes to do much wisdom. It doesn’t work at all.
” अंथरूण पाहून पाय पसरावे.”
अर्थ: आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
Meaning Of ” अंथरूण पाहून पाय पसरावे.“=Keep the expenses as per your ability.
“ असतील शिते तर जमतील भुते.”
अर्थ: एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
Meaning Of ” असतील शिते तर जमतील भुते.“=If a person benefits, people gather around him.
“ आवळा देऊन कोहळा काढणे.”
अर्थ: 1)आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
2)क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
Meaning Of “ आवळा देऊन कोहळा काढणे.” = Giving false hope and then disappointing or Making a big profit out of a small thing.
अर्थ: एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
“ आयत्या बिळावर नागोबा.”
Meaning Of “ आयत्या बिळावर नागोबा.”= Having a tendency to take advantage of what one has done for oneself.
अर्थ: आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
“ आपलेच दात आपलेच ओठ.”
Meaning Of “ आपलेच दात आपलेच ओठ.”= One’s own teeth, one’s own lips.
अर्थ: तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
“ आलिया भोगासी असावे सादर.”
Meaning Of “ आलिया भोगासी असावे सादर.”= Accepting the situation that has created complaints and grumbles.
अर्थ: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.
“ आयजीच्या जीवावर बायजी उदार.”
Meaning Of “ आयजीच्या जीवावर बायजी उदार.” = Showing generosity by spending someone else’s money.
अर्थ: फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.
” आपल्याच पोळीवर तूप ओढणे.”
Meaning Of ” आपल्याच पोळीवर तूप ओढणे.”= Just to get that much benefit for yourself.
“आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.”
अर्थ: अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.
Meaning Of “आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.”=Gain more than expected.
“ आपला हात जगन्नाथ.”
अर्थ: आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
Meaning Of “ आपला हात जगन्नाथ.”=Our progress depends on our performance.
“ आईचा काळ बायकोचा मवाळ.”
अर्थ: आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा.
Meaning Of “ आईचा काळ बायकोचा मवाळ.”=Cares for his wife while neglecting his mother.
“ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.”
अर्थ: मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
Meaning Of “ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.”=Basically creating a condition conducive to the lazy attitude of a lazy person.
“ आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली.”
अर्थ: अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
Meaning Of “ आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली.”=Extremely silly exaggeration.
“आधी शिदोरी मग जेजूरी.”
अर्थ: आधी भोजन मग देवपूजा.
Meaning Of “आधी शिदोरी मग जेजूरी.”=First food then worship
“आचार भ्रष्टी सदा कष्टी.”
अर्थ: ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
Meaning Of “आचार भ्रष्टी सदा कष्टी.”=Whose morals are not good. He is always sad.
“ आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.”
अर्थ: एकानं काम करावं आणि दुसर्यांनं त्याचा फायदा घ्यावा.
Meaning Of “ आंधळे दळते कुत्रं पीठ खाते.”=One should work and others should benefit from it.
” आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं.”
अर्थ: स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
Meaning Of ” आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं.”=Having a tendency towards good in oneself and bad in others.
” अळी मिळी गुप चिळी.”
अर्थ: रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
Meaning Of ” अळी मिळी गुप चिळी.”=Everyone had to swallow the beans so as not to reveal the secret.
” अहो रूपम अहो ध्वनी.”
अर्थ: एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
Meaning Of ” अहो रूपम अहो ध्वनी.”=Giving false praise to one another without showing one another’s limits.
“ आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.”
अर्थ: ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
Meaning Of “ आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला.”=A fault for which we laugh at another. The same fault lies with us.
“ अचाट खाणे मसणात जाणे.”
अर्थ: खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
Meaning Of “ अचाट खाणे मसणात जाणे.”=If there is excess in food and drink, the result is bad.
“ ओळखीचा चोर जीवे न सोडी.”
अर्थ: ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
Meaning Of “ ओळखीचा चोर जीवे न सोडी.“ =A known enemy is more dangerous than an unknown enemy.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.