Marathi Ukhane || मराठी उखाणे || Latest Marathi Ukhane for Female
“उखाणे हे मराठी संस्कृतीतील विनोदी आणि काव्यमय जोडे आहेत, जे अनेकदा विवाहसोहळ्यांमध्ये आणि सामाजिक मेळाव्यात व्यक्तींची प्रशंसा करण्यासाठी आणि उत्सवाचे वातावरण वाढवण्यासाठी पाठवले जातात.”
“Ukhane are witty and poetic couplets in Marathi culture, often recited during weddings and social gatherings to praise individuals and enhance the festive atmosphere.”
Latest Marathi Ukhane for Female || महिलांसाठी मराठी उखाणे ||
(१ )
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
रावांचे नाव घेते ___ ची सून.
(२ )
लग्नासाठी मुले पाहिले, सतराशे साठ,
अखेर __ रावांशी बांधली, लग्नाची गाठ.
(३)
लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
__ रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व?
(४ )
दासांचाही दास श्रीहरी, नंदाचा नंदन,
__ रावांचे नाव घेऊन करते, तुम्हा सर्वांना वंदन.
(५ )
शब्दही न बोलता, साद घातली कुणी,
__ राव आहेत, माझ्या दिलाचे धनी.
(६)
उंच मनोरे, नव्या जगाचे,
__ रावांमुळे भेटले मला, हे दिवस सुखाचे.
(७ )
रंग हे नवे, गंध हे नवे,
__ रावांची साथ, मला ७ जन्मी हवे.
(८ )
देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
खूप खुश आहे आज मी, कारण __ सोबत माझे लग्न जुळाले.
(९ )
आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज,
__ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
(१० )
हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
__ राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.
Marathi Ukhane for Female || महिलांसाठी मराठी उखाणे ||
(११ )
आई वडिलांपेक्षा, नाही मोठी कोणाची माया,
__ रावांच्या सानिध्यात येऊन, भेटली मला छाया.
(१२ )
जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
___ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.
(१३)
रायगडावर केले मी, शिवरायांचे दर्शन…
__ रावांच्या प्रेमासाठी, संपूर्ण जीवन अर्पण.
(१४ )
फुलांचा सुगंध, दरवळला चहूकडे,
_ रावांचे नाव, मोठं होउदे सगळीकडे.
(१५ )
संत्री ला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑरेंज,
__ आणि माझे झाले लव्ह मॅरेज.
(१६)
आयुष्यात काही मिळवायचे असेल, तर पाहिजे जिद्द,
__ रावांसोबत राहून करेन, संपूर्ण स्वप्न सिद्ध.
(१७ )
आई बाबा आहेत, सर्व प्रथम गुरु,
__ रावांसोबत आजपासून, पुढचा प्रवास सुरु.
(१८ )
आहे मी एकुलती एक, नाही कधी वाईट केले कसले सेवन,
__ तुमच्यासाठी शिकेन मी, बनवायला जेवण.
(१९ )
चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा,
_ रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.
(२० )
श्रीमंत असोवा गरीब असो, स्त्रियांना आवडते माहेर,
_ रावांनी दिला मला, सौभाग्याचा आहेर.
Marathi Ukhane for Female ( महिलांसाठी मराठी उखाणे )
(२१ )
भजन करताना लागते टाळ, ढोलकी आणि विना,
__ रावांचे नाव घेते, जय महाराष्ट्र म्हणा.
(२२ )
सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात,
__ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.
(२३)
संस्कृत भाषेमुळे, सर्व भाषा झाल्या तयार,
_ रावांचे इंग्रजी ऐकून, झाले मी घायाळ.
(२४ )
लग्नाच्या आधी, बांधला नवीन बंगला,
_ रावांच्या प्रपंचात, जीव माझा रंगला.
(२५ )
हिमालय पर्वतावरून, नदी वाहते कलिका,
_ रावांचे नाव घेते, मी पाटलांची बालिका.
(२६)
मंडप सजवण्यासाठी, आणली छान छान फुले,
_ रावांचे नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.
(२७ )
पुण्याला आहे आळंदी ,
_ माझ्या आयुष्यात आले, म्हणून आहे मी आनंदी.
(२८ )
संध्याकाळची बत्ती लावायचा, टाईम असतो सात,
_ रावांना देईल मी, जन्मो जन्माची साथ.
(२९ )
विवाहाच्या मंडपात, सुंदर फुलांचा थाट,
__ रावांचे नाव घेऊन बांधते, वधू वराची गाठ.
(३० )
ऊन पावसात कष्ट करून, पिकवलं शेतात सोन,
_ राव हेच माझ्या, सौभाग्याच लेणं.
Marathi Ukhane || मराठी उखाणे ||
(३१ )
वोटिंग करण्यासाठी, लाईन लागली क्रमाने,
_ रावांचे नाव घेते, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
(३२ )
सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात,
__ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या वृंदावनात.
(३३)
पैठणी साडी आहे, महाराष्ट्राची शान,
__ रावांचे नाव घेताना, मला वाटतो अभिमान.
(३४ )
आवडता ऋतू आहे, आमचा पाऊस,
__ रावांना माझे नाव घेण्याची, खूप हाऊस.
(३५ )
देवा सारखा पिता, आणि देवी सारखी माता,
_ राव मिळाले, स्वर्ग आला हाता.
(३६)
नूतन वर्षाचा शुभारंभ करीत, येतो पाडवा,
_ रावांच्या सानिध्यात, राहो सदैव गोडवा.
(३७ )
निवडणूक लढायला, आहेत खूप पक्ष,
__ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्ष.
(३८ )
कपाळावर कुंकू, जसा चंद्रकोर चा ठसा,
_ रावांच नाव घेते , सर्वजण बसा.
(३९ )
गणपती बाप्पाचे, चरण स्पर्श करते खाली वाकून,
_ रावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून.
(४० )
नव्या नवरीचा आज उतरला साज,
खऱ्या अर्थाने गृहिणी __ रावांची झाले आज.
Marathi Ukhane for Female ( महिलांसाठी मराठी उखाणे )
(४१ )
लग्नकार्य हा आयुष्यातील एक, महत्वाचा भाग आहे,
__ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सदैव असाच राहे.
(४२ )
हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास,
_ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.
(४३)
गुणवान पती मिळावा, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
__ राव माझ्या, जीवनातील मौल्यवान ठेवा.
(४४ )
लग्नात बांधला, सर्व पाहुण्यांनी फेटा,
_ रावांच्या संसारात, माझा आहे अर्धा वाटा.
(४५ )
सर्वांच्या नावाप्रमाणे, वेगवेगळ्या आहेत राशी,
_ रावांचे चरण, हीच माझी अयोध्या काशी.
(४६)
नूतन वर्षाचा शुभारंभ करीत, येतो पाडवा,
_ रावांच्या सानिध्यात, राहो सदैव गोडवा.
(४७ )
महाराष्ट्रात असावे, मराठी भाषेचे वर्चस्व,
_ राव आहेत, माझे सर्वस्व.
(४८ )
चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे,
__ च नाव घेते देवापुढे.
(४९ )
दहातून दहा गेले, बाकी राहिले शून्य,
__ रावांसारखे पती मिळाले, हेच माझे पुण्य.
(५० )
चांदीची जोडवी, पतीची खूण,
_ रावांचे नाव घेते, आजपासून झाली _घराण्याची सून.
काही स्पेशल उखाणे: