५० Marathi Ukhane for Male || पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे ||

पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male)

विवाह हा एक गंभीर वचनबद्ध असताना, आनंद, हशा आणि सामायिक अनुभवांनी भरलेला प्रवास देखील आहे.

लग्नाच्या उत्सवादरम्यान, विनोदी उखाणे यांचा समावेश केल्याने कामकाजात हलके-फुलकेपणा येतो आणि जोडप्याला प्रेमाने मागे वळून पाहता येईल अश्या आठवणी निर्माण होतात.

हे विनोदी आणि खेळकर वाक्ये स्वतःला जास्त गांभीर्याने न घेण्याचे, दैनंदिन परिस्थितीत विनोद शोधण्यासाठी आणि हलक्या मनाने आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्मरणपत्र म्हणून काम करतात.

ते प्रेम व्यक्त करण्याचे, एकमेकांना चिडवण्याचे आणि जोडप्यामधील बंध दृढ करण्याचे साधन म्हणून काम करतात.

पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे  (Marathi Ukhane for Male)

(१ )

_____च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट, _____ला पाहून, पडली माझी विकेट.

(२ )

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी, _____समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.

(३)

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान_____च्या रूपाने, झालो मी बेभान.

(४ )

पुरणपोळीत तुप असावे साजुक,_____आहेत आमच्या फार नाजुक.

(५ )

टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, _____चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.

(६)

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं, माझं मन रोज नव्याने, _____च्याच प्रेमात पडतं.

(७ )

हत्तीच्या अंबारीला, मखमली झूल_____माझी नाजूक, जसे गुलाबाचे फूल.

(८ )

कोकिळेचा आवाज, वाटतो खूपच गोड _____ला जपतो मी, जसा तळहाताचा फोड.

(९ )

ओझर गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. _____चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल.

(१० )

भल्यामोठ्या समुद्रात छोटीशी होडी ,_____ची आणि माझी लाखात एक जोडी.

Marathi Ukhane for Male | मराठी उखाणे नवरदेवासाठी | Ukhane in marathi

(११ )

पाहताच, _____ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.

(२ )

विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात, _____अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.

(३)

नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व, _____आहे माझे जीवन सर्वस्व.

(४ )

पार्ले ची बिस्कीटे बेडेकरंचा मसाला , _____ नाव घ्यायला आग्रह कशाला.

(५ )

सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप, मला मिळाली आहे, _____अनुरूप.

(६)

प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल , _____च्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल.

(७ )

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, _____चे नाव घेतो _____च्या घरात.

(८ )

झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,शोभून दिसते , _____आणि माझी जोडी.

(९ )

तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे, विसर पडतोय दुःखाचा, _____.बरोबर लग्न करून, संसार करेन मी सुखाचा

(२० )

सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बनली आहे सूर्यमाला अन, _____च नाव घेतो घालून तिला वरमाळा.

पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male)

(२१ )

सायंकाळच्या आकाशाच्या निळसर रंग, पण, _____आहे घरकामात दंग.

(२ )

मोगऱ्याची कळी उमलली असता,दरवळतो सर्वत्र सुगंध, _____च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.

(३)

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले अन्, _____चा चेहरा नेहमीच हसुन खुले.

(४ )

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा, _____च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

(५ )

सोन्याच्या कपावर चांदीची बशी,_____समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी .

(६)

हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, _____मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.

(७ )

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, _____च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.

(८ )

पिवळ्या धम्मक साडीची दिली मी तिला भेट, अन, _____साठी कायम खुल माझ्या मनाचं गेट.

(९ )

आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल, _____दिसते खडूस पण मन मात्र तिच विशाल.

(३० )

यमुनेच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी , _____ला घेऊन जातो तिच्या सासरी.

Marathi Ukhane for Male || हलके-फुलके मराठी उखाणे || Ukhane in marathi

(१ )

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, _____चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.

(२ )

हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, _____च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.

(३)

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, _____ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

(४ )

रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, _____ला पाहून चंद्र-सुर्य हसे.

(५ )

सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा _____तु, मी आणि एक मुल.

(६)

जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, _____च्या सहवासात झालो मी धुंद.

(७ )

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,_____ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

(८ )

दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी _____व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.

(९ )

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,_____ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.

(४० )

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, _____च नाव घेऊन, घरात जायची मला लगली आहे घाई.

Marathi Ukhane for Male ( पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे ) Ukhane in marathi

(१ )

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी, _____च नाव घेतो मी तिचा राजा अन् ती माझी राणी.

(२ )

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस, _____ .तू मला, सुपरवूमन वाटतेस.

(३)

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, _____झाली आज माझी गृहमंत्री.

(४ )

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ, _____शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.

(५ )

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस, _____तू फक्त, गोड हास.

(६)

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो _____ला जलेबी चा घास.

(७ )

रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, _____च्या साथीने आदर्श संसार करीन.

(८ )

खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम, _____वर आहे माझे खूप प्रेम.

(९ )

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी, _____माझी झाल्यापासून जळतात लोक सारी.

(५० )

तुझ्या माझ्या प्रेमाच्या प्रवासात मोह, माया कसलीच नसावी.अन् आयुष्यातील पुढील प्रत्येक क्षणांची सोबत ही फक्त, _____ चीच असावी.

हे देखील पहा :

1 thought on “५० Marathi Ukhane for Male || पुरुषांसाठी हलके-फुलके मराठी उखाणे ||”

Leave a Comment