महाशिवरात्री स्पेशल मराठी उखाणे || Mahashivratri Special Ukhane In Marathi ||

स्त्रियांसाठी महाशिवरात्री स्पेशल मराठी उखाणे. | Ukhane for Women | मराठी उखाणे | Marathi Ukhane | Mahashivratri Special Ukhane In Marathi | Ukhane

महाशिवरात्री स्पेशल मराठी उखाणे. (Mahashivratri Special Ukhane In Marathi)

(१ )

महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलपत्र _____ रावांचे नाव घेते आज आहे महाशिवरात्र.

(२ )

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी _____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

(३)

महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून _____ रावांचे नाव घेते तुमचा मान राखून.

(४ )

देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगीनी _____ रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी.

(५ )

महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतात दही आणि दुधाने , _____ रावांचे नाव घेते प्रेमपेक्षा भक्तीने.

(६)

महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिव पार्वतीचा ध्यास _____ रावांसाठी केला आज शिवरात्रीचा उपवास.

(७ )

बेलाचे पान महादेवाला वाहिले _____ रावांसाठी _____ गाव पाहिले.

(८ )

शंकराच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर _____ रावांसारखे पाती मिळायला माझे नशीब थोर.

(९ )

महादेवाचे नावे आहेत रुद्र भीम शंकर _____ रावांवर मी प्रेम करते भयंकर.

(१० )

भगवान शिवशंकरांनी केला अमरनाथ येथे निवास _____ रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

महाशिवरात्री स्पेशल मराठी उखाणे || Mahashivratri Special Ukhane In Marathi ||

(११)

महाशिवरात्रीच्या दिवशी ताटात ठेवला बेलाच्या पानाचा जुडा _____ रावांच्या हातात आगरबत्तीचा पुडा.

(१२)

हर हर महादेवाचा होऊदे गजर _____ राव वगतात कसे यावर सगळ्यांची नजर.

(१३)

आपल्या जीवनात शिव शंकराची असावी शक्ति _____ राव करतात शिव शंकराची भक्ति.

(१४)

शिव शंकरा मुले आहे सारी सृष्टि , _____ रावांनी दिली मला नवीन जीवन दृष्टी.

(१५)

बेलाचे पान वाहिते महादेवाला , _____ रावांना सदा सुखी ठेव हीच प्रार्थना शिव शांभो शंकराला.

(१६)

शिवशंकराची रहूदे आमच्यावर नेहमी छाया , _____ रावांची राहू दे आयुष्यभर अशीच माया.

(१७)

भोलेनाथ शिव शंकराला आवडते बेलाचे पान, _____ रावांच्या आयुष्यात मला सौभाग्याचा मान.

(१८)

शिवशंकरचा महिमा आहे अपरंपार , _____ रावांना आवडते शिवाची भक्ति करायला वारंवार.

(१९)

महादेव , भोलेनाथ , उमपती , उमेश, गंगाधर , अशी शिवशंकरांची नाव आहेत गोड, _____ रावांच्या प्रेमाला नाही काशाची तोड.

(२०)

शंकर-पार्वतीची छान आहे जोडी, _____ रावांचे नाव घेते मला आहे संसाराची गोडी.

(२१)

महादेवाला अर्पण करती बेल पत्र १०८, _____रावाच नाव घेते आता सोडा माझी वाट.

(२२)

शिव लिंगावर केले पंचामृताचा अभिषेक , _____ रावना आवाड़ते बदामशेक.


Leave a Comment