गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे || Gudi Padwa Special Marathi Ukhane ||

पुरुष व स्त्रियांसाठी गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे. | Ukhane for Women | मराठी उखाणे | Marathi Ukhane | Gudi Padwa Special Marathi Ukhane | Ukhane | unisex ukhana | male female ukhane | Ukhane for Male and Female | Marathi Ukhane for Male and Female |

गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे. (Gudi Padwa Special Marathi Ukhane)

गुढी पाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे.गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आणि नवीन आरंभाचा प्रतीक. हा सण हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

गुढीपाडव्याला लोक आपली घरे सजवतात आणि घरात नवीन वस्तूंची खरेदी या दिवशीच केली जाते. गाडी, सोनं यासारख्या वस्तूंची खरेदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केली जाते. गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व देखील आहे. या दिवशी लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात.

नव विवाहित जोडपे घरगुती व सार्वजनिक ठिकाणी नव नवीन खेळांमधे व स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि उखाणे घेतात.

गुढी पाडवा स्पेशल खास मराठी उखाणे. | Gudi Padwa Special Marathi Ukhane |

(१ )

नव वर्षाचा पहिला सण आला गुढीपाडवा , _____रावांच्या जीभेवर असतो , साखरे सारखा गोडवा

(२ )

साखरेच्या गाठी कडूलिंबाचा तुरा , _____ रावाना आवडतो साजुक तुपाचा शिरा.

(३)

कडू लिंब , गाठी आणि भरजरी साडीचा खण,
_____रावा सोबत साजरा करते , गुडीपाडवाचा सण.

(४ )

उंच नभात शोभून दिसे गुढीचा थाट ,
_____रावाच नाव घेते , आता सोडा माझी वाट.

.

(५ )

गुडी पडवाचा दिवशी ,सर्वांचे व्हावे स्वप्न पूर्ण
माझ्या शिवाय , _____राव आहेत अपूर्ण.


(६)

गुढीपाडव्याला स्वयंपाक केला वरण भात आणि श्रीखंड, _____रावांचे नाव घेते आणि देवाकडे मागते सौभाग्य अखंड.

(७ )

दारी लाऊ गुडी
सौभाग्य आणि यशाची
_____रावा सोबत सुरुवात करते नववर्षाची
.

.

(८ )

आज आहे नव वर्ष गुडी पाडवाचा दिवस , _____रावा साठी
केला श्री गणेशा पुढे नवस.

(९ )

दारी ऊंच गुडी व्हावी यशाची वृद्धी,
_____रावांच नाव घेते घरी यावी सुख समृद्धी.

(१० )

जपूया मराठी परंपरा आणि रूढी ,
_____रावांच नाव घेऊन दारी उभारली गुढी.

गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे || Gudi Padwa Special Ukhane In Marathi ||

Gudi Padwa Special Marathi Ukhane
Gudi Padwa Special Marathi Ukhane

(११)

मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याणे , _____रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

(१२)

उभारुणी आनंदाची गुडी दारी ,
_____रावांच्या जीवनात,
येवो रंगत न्यारी.

(१३)

नविन वर्षाच्या सुरुवातीला रंगवले जातात स्वप्न, _____रावांच्या संसारात मी आहे मग्न.

(१४)

गुढीपाडव्याला स्वयंपाक केला वरण भात आणि श्रीखंड ,_____रावांचे नाव घेते आणि देवाकडे मागते सौभाग्य अखंड.

(१५)

मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला येतो चैत्र, _____रावांचे नाव घेऊन सांगते, हसत खेळत संसार करणे हेच आहे जिवणाचे सुत्र.

(१६)

उंच आकाशात घेऊन भरारी,
गुडी उभी राहिली प्रतेक दारी.
_____रावांचे नाव घेते,
दौडत आली नववर्षाची स्वारी.

(१७)

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी वाट,
_____रावांच्या आयुष्यात येवो,
नव्या स्वप्नांची लाट.

(१८)

रेशमी वस्त्र , चांदीचा लोटा उखाणा घेते सर्वात मोठा
कडू लिंबाचा तूरा ,साखरेचा कडा
दारी रांगोळी आणि शेणाचा सडा
पुरणाचा नैवेद्य , फुलाचा हार
नव वर्षाची सुरुवात गुडीपाडवाचा वार
उंच झेप यशाची वृद्धी
घरी यावे ऐश्वर्य , सुख समृद्धी
मराठी संस्कृती , पारंपरिक रूढी
दरी उभारते _रावांसोबत गुढी
.

(१९)

रांगोळी काढली दारी , दिवा लावला देवापाशी
_____रावांचे नाव घेते गुडीपाडव्याच्या दिवशी.

गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे || Gudi Padwa Special Ukhane In Marathi || Marathi Ukhane for Male and Female || Unisex Ukhana ||

गुढी पाडवा स्पेशल मराठी उखाणे

(२०)

आजच्या मंगलदिनी राम, लक्ष्मण, सीता परतले आयोध्यापुरी
_____चे नाव घेऊन गुढी उभारतो दारी.

(२१)

नूतन वर्षाची चाहूल घेऊन आला गुढीपाडवा,
माझ्या आणि _____च्या संसारातला आनंद सदैव वाढवा.

(२२)

गुडीसाठी रेशमी साडी आणि दरात सुंदर रांगोळी,
_____रावांसाठी केली पुरणाची पोळी.

(२३)

मांगल्याच्या गुडीला घातल्या साखरेच्या गाठी ,
_____चे नाव घेतो खास तुमच्यासाठी.

(२४)

मंगल्याचं तोरण , यशाची गुढी
_____रावांच्या सोबत जपल्या पूर्वीच्या परंपरागत रूढी.

(२५)

गुडी पाडव्याची उगवली , सुंदर सोनेरी पहाट.
_____रावांसंगे बांधली , जन्मोजन्मीची गाठ.

(२६)

मराठमोळा आहे गुडीपाडव्याचा सण ,
_____रावांच्या संसारात , आता रमले माझे मन.

Leave a Comment