राम नवमी स्पेशल मराठी उखाणे || Ram Navami Special Marathi Ukhane ||

स्त्रियांसाठी राम नवमी स्पेशल मराठी उखाणे. | Ukhane for Women | मराठी उखाणे | Marathi Ukhane | Ram Navami Special Marathi Ukhane | Ukhane | ukhane marathi | female ukhane | Ukhane for Female | Marathi Ukhane for Female | महिलांसाठी राम नवमी स्पेशल मराठी उखाणे | बायकांचे उखाणे | Ram Navami Special Marathi Ukhane For Female |

राम नवमी स्पेशल मराठी उखाणे || Ram Navami Special Marathi Ukhane ||

(१ )

राम मंदिरात वहिला फुलांचा हार,
नशिबानेच मिळतो ____रावांसारखा जोडीदार.

(२ )

रामाने केले शिवधनुष्य भंग,
_____रावांच्या जीवनात मी झाले दंग.

(३)

रामाचा बाण कृष्णाची बासरी,
_____रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी सासरी.

(४ )

राम झाले विजयी सीतेला स्मरून,
_____रावांचे नाव घेते माता दुर्गेला स्मरून.

(५ )

राम निघाले वनवासाला सीता आहे सोबती,
_____रावांच्या संसारात उणीव नाही कोणती.

(६)

रामा समोर लावते मी रोज तुपाचा दिवा,
_____रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा.

(७ )

राम आणि सीतेची सदैव राहो कृपादृष्टी,
_____रावांच नाव घेते बहरली आहे आज सारी सृष्टी.

(८ )

पावसाळ्यात आकाशात चमकतात विजा, _____रावांसोबत करते मी, प्रभू राम सीतेची पूजा.

(९ )

रामाने सीतेसाठी उचलले शिवधनुष्य,
_रावांसाठी मागते मी दीर्घायुष्य.

(१० )

राम सीतेसाठी केला मी गोडाचा प्रसाद,
__रावांच नाव घेते असावा सदैव आशीर्वाद.

महिलांसाठी राम नवमी स्पेशल मराठी उखाणे || Ram Navami Special Marathi Ukhane For Female ||

Ram Navami Special Marathi Ukhane

(११)

राम लक्ष्मण ची जोडी अमर झाली जगात,
_____चे नाव घेते ,_____च्या घरात.

(१२)

प्रभू रामांच्या पूजनाने मिळते सुख आणि समृद्धी,
_____रावांच्या आनंदात होवो सदैव वृद्धी.

(१३)

राम गेले वनवासला सीता करते नवस,
_____रावांचे नाव घेते, आज आहे रामनवमीचा दिवस.

(१४)

राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात,
_____रावांच नाव घेते नीट ठेवा ह लक्षात.

(१५)

सिते सारखे चरित्र,रामा सारखे रूप अगदी तसेच, _____राव मिळाले मला अनुरूप.

(१६)

प्रभू रामांची सुंदर मूर्ती, जणू राम अवतरले साक्षात,
_____रावांचे नाव घेते, नीट ठेवा लक्षात.

(७)

प्रभू रामांच्या चरणाशी फुलांच्या राशी,
_____रावांचे नाव घेते, राम नवमी च्या दिवशी.

(१८)

प्रभू श्री रामांच्या दर्शनासाठी भक्त जमले खूप,
_____रावांचा भोळा स्वभाव मला आवडतो खूप.

(१९)

राम गेले वनवासला सीता करते नवस,
_____रावांचे नाव घेते, आज आहे रामनवमीचा दिवस.

(२०)

वाल्मिकींचे रामायण, व्यासांची भगवद्गीता,
_____राव माझे राम, मी त्यांची सीता.

(२१)

राम मंदिरात जाऊन घेतला मी प्रसाद आणि तीर्थ,
_____रावांच्या सहवासाशिवाय जीवन आहे व्यर्थ.

(२२)

राम आणि सीतेची जगप्रसिद्ध आहे जोडी,
_____रावांच्या सोबतीने आली आयुष्याला गोडी.

(२३)

राम मंदिरात जमली भक्तांची मांदियाळी,
_____रावांचे नाव घेते आजच्या मंगल दिनी.

(२४)

रामाच्या दरबारात सत्याला स्थान,
_____रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान.

(२५)

प्रभू राम आणि सीतेसाठी केला मी गोडाचा प्रसाद,
_____रावांच नाव घेते सदा असावा तुमचा आशीर्वाद
.

(२६)

प्रभू रामचंद्रांना बोरे अर्पण करून ,
शबरीने जीवन केले कृतार्थ,
_____राव म्हणतात, “श्रद्धेविना जीवनाला नाही अर्थ .”

Leave a Comment