Vasubaras Wishes in Marathi || वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा ||

Vasubaras Wishes in Marathi | Govatsa Dwadashi | Wishes in Marathi | Govatsa Dwadashi | Vasubaras | वसुबारस | गोवत्स द्वादशी | वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा | गोवत्स द्वादशी शुभेच्छा | Vasubaras Wishes Marathi |

आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

वसुबारस :

वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. “वसुबारस” या शब्दाचा अर्थ “वसु” म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली “बारस” म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

वसुबारस या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा केली जाते. (पाडस म्हणजेच गाईचे वासरू)
आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि परिसरात पणत्या लावून दिवाळीचा पहिला दिवसाची सुरुवात होते.

दिवाळीचा पहिला दिवस मंगलमय शुभेच्छा मित्र-परिवाराला (Vasubaras Wishes) पाठवून साजरा करुयात.

Vasubaras Wishes in Marathi || वसुबारसनिमित्त हार्दिक शुभेच्छा ||

हे वसुबारस शुभेच्छा संदेश तुम्ही सहज Whatsapp, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना पाठवू शकतात.

(१ ) दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!

(२ ) वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !

(३ ) वसुबारस आणि आजपासून सुरू होणाऱ्या दीपोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

(४ ) गोवत्स व्दादशी आनंदाची, संस्कृती पशुसंवर्धनाची वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.

(६ ) वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा ! आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

image for Vasubaras Wishes in Marathi

(७ ) सर्वांना वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा या मंगलदिनी घरोघरी यश-समृद्धी, सुख नांदावे हीच देवाकडे प्रार्थना.

(८ ) दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन वासराच्या वात्सल्याचा. वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

(९ ) धन-धान्यची व्हावी तुमच्या घरी सदा वृद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी तुम्हाला समृद्धी!

(१० ) स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया.. परमपुज्य जी वंद्य या भारताला, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला.. वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!

वसुबारस सणाच्या हार्दिक शुभेच्छा ( Vasubaras Wishes in Marathi )

Vasubaras Wishes in Marathi

गोवत्स द्वादशी / वसुबारस सणाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीतून share करा आपल्या प्रियजणाण सोबत Govatsa Dwadashi/Vasubaras Wishes in Marath:

(११ ) जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा, गायी आणि वासरांची सेवा आणि संरक्षण करा. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

(१२ ) वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!

(१३ ) वसुबारस म्हणजेच गाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. वसुबारस निमित्त आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!

(१४ ) स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा…!

(१५ ) वसुबारस अर्थात दिवाळीचा पहिला दिवस, गाय-वासराच्या नात्यातील ममत्व, प्रसंन्नता आणि मांगल्य सर्वांना लाभो हीच मंगलमय कामना. वसुबारस निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!

(१६ ) श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला दत्ताचरणी आश्रय दिधला, कामधेनू म्हणती भक्त तिजला, पुरवी सर्वांच्या मनोकामनेला. वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा शुभ दिपावली!

(१७ ) दिवा लावू चैतन्याचा, दिवा लावू नवविचारांचा, दिवस हा सोनियाचा, गाई-गुरांच्या कृतज्ञेचा, पूजन करू वसुबारसेचे, दान मागू आरोग्याचे, पुरण वरणाचा नैवेदय देवू, गोमातेच्या चरणी लीन होवू. वसुबारस च्या हार्दिक शुभेच्छा.

(१८ ) गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो! वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा.!

(१९ ) राज्य पुन्हा एकदाचे बळीराजा तुझे यावे, इडा पिडा ही टळावी, दुःख दारिद्र्य जळावे, सुखा समाधानाची आनंदी क्षणांची, दिवाळी तुमची-आमची खूप साऱ्या शुभेच्छांची.

(२० ) शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी असणारे सेंद्रिय नाते सुदृढ करणारा वसुबारस हा सण. या सणानिमित्ताने शुभेच्छा. वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

Leave a Comment