Dasra Wishes in Marathi | Dasra Wishes Marathi | Wishes | Greetings | Dussehra Wishes | दसऱ्याच्या शुभेच्छा | विजयादशमीच्या शुभेच्छा |
आला आला दसरा, दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा, साजरा करु दसरा…
दसरा/विजयादशमी.
दसरा हा संस्कृतमधील “दशहरा” या शब्दातून आलेला आहे, ज्यामध्ये “दश” म्हणजे दहा आणि “हरा” म्हणजे पराभव किंवा हरवणे.काळाच्या ओघात संस्कृतमधील “दश-हरा” हा शब्द मराठीत “दसरा” या रूपात बदलला. हा सण विशेषतः रामायणात प्रभू रामाने दहा डोक्यांच्या रावणाचा वध केल्याचा विजय दर्शवतो. त्यामुळे, दसरा हा धर्माचा (सत्कर्माचा) अधर्मावर (पापकर्मावर) विजय सूचित करतो.
हा शौर्य, पराक्रम, आणि धर्माच्या विजयाचा सण मानला जातो. नऊ दिवस चाललेल्या युद्धात देवी दुर्गेने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता, म्हणून हा सण विजयादशमी या नावाने देखील ओळखला जातो. विजयादशमी, सत्याचा असत्यावर विजय सूचित करते.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन, वाहनपूजन, आणि विविध प्रकारच्या पूजा विधी देखील केले जातात. हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त असल्यामुळे व्यापार, शेती किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
दसऱ्याच्या शुभेच्छा || Dasra Wishes in Marathi ||
दसरा ह्या शुभ दिनानिमित्यानी इष्टमित्रांना, आप्तेष्टांना, नातेवाईकांना द्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
(१ ) सीमा ओलांडून आव्हानांच्या, शिखर यशाचे गाठायचे ! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे..! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(२) नवी पहाट, नवी आशा तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा नवी दिशा, नवे स्वप्न नवीन आकांक्षा, विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा..!
(३ ) सोनेरी दिवस, सोनेरी पर्व सोनेरी क्षण, सोनेरी आठवणी सोन्यासारख्या लोकांना सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा. दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
(४ ) आपट्याची पाने, झेंडुची फुले घेवूनी आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
(५ ) लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा… तुम्हां सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(६ ) वाईटावर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास, जाळोनिया द्वेष- मत्सराची कात, मनोमनी वसवी प्रेमाची आस. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
(७ ) झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा! सर्वांना शुभ दसरा.
(८ ) सोन्यासारखे नाते तुमचे- माझे हळुवार जपायचे, दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे…विजयादशमीच्या शुभेच्छा!
(९ ) दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने, या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने! दसरा, विजयदशमीनिमित्त सर्वांना शुभेच्छा!
(१० ) विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, मित्र-परिवारासासह वाढू दे दसऱ्याचा आनंद सर्वांना विजयादशमी, दसऱ्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा!
|| Dasra Wishes in Marathi ||
ह्या दसऱ्याच्या (Dasra Wishes in Marathi) शुभेच्छा शुभेच्छा संदेश तुम्ही सहज WhatsApp, Facebook, Text, Sms,व इतर Social Media द्वारे तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांना पाठवू शकतात.
(११ ) आला आला दसरा, दु:ख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करु दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(१२) दसऱ्याचा उत्सव तुमच्या जीवनात शांती आणि आनंद घेऊन येवो. दसऱ्याच्या शुभेच्छा!
(१३ ) अज्ञानावर ज्ञानाने, शत्रुवर पराक्रमाने.. अंधारावर प्रकाशाने, क्रोधावर प्रेमाने विजय मिळवण्याचा सण म्हणजे विजयादशमी! दसऱ्याच्या शुभेच्छा.
(१४ ) उस्तव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
(१५ ) झेंडूची तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊद्या घरी, पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमी आणि दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
(१६ ) दारात झेंडूचे तोरण लावून, रांगोळीमध्ये रंग भरू, गोडधोडाचा नैवेद्य करुन, अस्त्र, शस्त्रांचे पूजन करुन करुयात दिन हा साजरा, तुम्हां सर्वाना माझ्या तर्फे Happy Dasra!
(१७ ) शांतता आणि सत्याच्या या देशात आता वाईटाला संपवायचं आहे, दहशती रावणाचं दहन करून पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे. शुभ दसरा शुभ विजयादशमी.
(१८ ) निसर्गाचं दान अन् आपट्याचं पान, त्याला सोन्याचा मान. तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती आणि समाधान. आपणास आणि आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
(१९ ) रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी, सजली दारी तोरणे ही साजिरी, उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा, उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
(२० ) त्याग केला सर्व इच्छांचा काहीतरी वेगळं करण्यासाठी, रामाने गमावलं खूप काही श्रीराम बनवण्यासाठी. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!
हे देखील पहा:
- आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा || Aai Birthday Wishes in Marathi ||
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! || birthday wishes in marathi ||
- लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा मराठीत || Anniversary Wishes in Marathi ||