Holi and Dhulivandan Wishes in Marathi || होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

Holi and Dhulivandan Wishes in Marathi | Dhulivandan Wishes in Marathi | Holi Wishes in Marathi |

होळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा.. होळीच्या शुभेच्छा!

होळी:

होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो, त्यामुळे याला ‘फाल्गुनी’ असेही म्हणतात.

पौराणिक कथेनुसार, या दिवशी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका प्रल्हादाला अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न करत असताना स्वतः जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला. या घटनेच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते.

होळीच्या दिवशी सायंकाळी ‘होलिका दहन’ केले जाते, ज्यात लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्या एकत्र करून पेटवल्या जातात. लोक या अग्नीभोवती प्रदक्षिणा घालतात आणि वाईट विचारांचे दहन करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी लोक एकमेकांना गुलाल आणि रंग लावून होळी साजरी करतात.

धुलिवंदन (धुळवड):

धुलिवंदन हा होळीची राख व माती अंगाला लावण्याचा दिवस असून हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी ( फाल्गुन वद्य प्रतिपदेस) साजरा करतात. यास धुळवड असेही म्हणले जाते. लहान-थोर सगळेच रंगांच्या या खेळात सहभागी होतात. हल्ली पाण्याने भरलेल्या पिचकाऱ्या आणि फुग्यांचा वापर करून लोक एकमेकांना रंगवतात.

Holi and Dhulivandan Wishes in Marathi || होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

होळी आणि धुलिवंदनाच्या (धुळवड) या खास शुभेच्छा तुम्ही Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता:

Holi Wishes in Marathi || होळीच्या हार्दिक शुभेच्छा ||

(१ ) वाईटाचा होवो नाश…आयुष्यात येवो सुखाची लाट…होळीच्या सगळ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!

(२ ) थंड रंगस्पर्श, मनी नवहर्ष, अखंड रंगबंध, जगी सर्वधुंद…होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता.. करू होम दु:ख, अनारोग्याचा होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा रंग नात्यांचा, रंग बंधाचा रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा रंग नव्या उत्सावाचा साजरा करू होळी संगे. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) होळीच्या पवित्र अग्निमध्ये, निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो, अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो. होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) प्रेम रंगाने भरा पिचकारी आपुलकीचे सारे रंग उधळू द्या. जगी या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) मत्सर, द्वेष, मतभेद विसरू प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली रे! होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१० ) होळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा.. होळीच्या शुभेच्छा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा ( Holi Wishes in Marathi )

Holi and Dhulivandan Wishes in Marathi:

(१ ) आली रे आली, होळी आली चला, आज पेटवूया होळी नैराश्याची बांधून मोळी, दाखवून नैवद्य पुरणपोळीचा मारूया हाळी… होळी रे होळी, पुरणाची पोळी करू आनंदाने साजरी होळी. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी, रंगांमध्ये रंगून जाण्याआधी, होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी, पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) प्रार्थना आहे की आपणास आणि आपल्या कुटुंबास ही होळी आनंदाची यशाची आणि समृद्धीची जावो. रंगबिरंगी होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

(४ ) फाल्गुन मासी येते होळी खायला मिळते पुरणाची पोळी, रात्री देतात जोरात आरोळी राख लावतो आपुल्या कपाळी, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(५ ) इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा, तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट प्रवृत्तीचा अंत हा झाला, रंगाचा सण हा आला, आनंद आणि सुख शांती लाभो तुम्हाला. होळीच्या शुभेच्छा!

(७ ) द्वेष आणि मतभेद विसरून, आपण सर्वजण माणुसकीच्या रंगात रंगूया. या होळीला, एकमेकांवर प्रेम आणि आपुलकीचा रंग उधळूया. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) अज्ञानाचा अंधार दूर करून, ज्ञानाच्या रंगांनी आपले जीवन उजळून टाका. या होळीला, नवीन गोष्टी शिकण्याचा आणि आपल्या ज्ञानाचा प्रसार करा. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) होळीच करायची तर अहंकाराची, असत्याची, अन्यायाची, जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची, गर्वाची, दु:खाची होळी करा. तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

(० ) आपल्यातील कला आणि सृजनात्मकतेला प्रोत्साहन द्या. या होळीला, नवीन कल्पना आणि विचारांना रंगांचे पंख द्या. होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Dhulivandan Wishes in Marathi || धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

Holi and Dhulivandan Wishes in Marathi:

(१ ) होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा आगळ्यावेगळ्या ढंगाचा वर्षाव करी आनंदाचा धुलिवंदनाच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

(२ ) भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद, अखंड उडू दे मनि रंगतरंग व्हावे अवघे जीवन दंग असे उधळू आज हे रंग धुलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, धुलिवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमयी शुभेच्छा!

(४ ) रंग साठले मनी अंतरी उधळू त्यांना नभी चला आला आला रंगोत्सव हा आला… तुम्हाला धुलिवंदनाच्या रंगीत शुभेच्छा!

(५ ) प्रेम रंगाने भरा पिचकारी आपुलकीचे सारे रंग उधळू द्या जगी या रंगाना माहीत नाहीत ना जाती ना बोली सर्वांना धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले, एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) क्षणभर बाजूला सारूया रोजच्या वापरातले विटके क्षण गुलाल, रंग उधळूया रंगूया रंगपंचमीच्या नशेत विलक्षण धुळवडीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

(८ ) नारिंगी रंग पळसा, फुलांचा हिरवा, गुलाबी-गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग एकमेकांना रंगवूया धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) सूर्याच्या दाहकतेवर करूया पाण्याचा शिडकाव ह्रदयात मिसळूया स्नेह हास्याचा भाव, होऊ तल्लीन सप्तसुरात, रंगवू एकमेकांना सप्तरंगात. धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(० ) गोड धोड खाद्याचा घेऊया आस्वाद, प्रेम भाव निर्माण करू, मिटवूया एकमेकातला वाद खेळूया संग उधळूया रंग, तुम्हाला धुळवडीच्या शुभेच्छा!

  • Color: Copper; Material: Copper; Package Content: 1 – Piece Copper Charge Water Bottle (930 ml); Dimension in cms (L x W…
  • This Bottle is Made of pure copper, this is BPA free and made of high-quality food-grade material. The material of the b…
  • Keep water overnight in the copper vessel and it will imbibe all the medicinal and Ayurveda benefits to the water. Drink…

( धुळवड ) धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा ( Dhulivandan Wishes in Marathi )

(१ ) गुलाल उधळू दे, रंग सांडू दे, आनंदाच्या सरींनी आसमंत भरू दे. धुळवडीच्या शुभेच्छा!

(२ ) धुळवडीचा हा रंगीबेरंगी सण, तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि उत्साह घेऊन येवो! शुभ धुळवंदन!

(३ ) जीवनातील सर्व दु:ख विसरून, आनंदाने रंग खेळण्याचा हा दिवस आहे! धुळवडीच्या रंगतदार शुभेच्छा!

(४ ) धुळवडीच्या शुभ मुहूर्तावर, नवे रंग, नवे स्वप्न, नवी उमेद, तुमच्या आयुष्यात नवे सौंदर्य खुलू दे!

(५ ) रंग गुलालांचे असले तरी, माणुसकीच्या रंगांनी रंगू दे जीवन! धुळवडीच्या प्रेमळ शुभेच्छा!

(६ ) पांढऱ्या रंगात शांती, लाल रंगात प्रेम, पिवळ्या रंगात आनंद, तुमच्या जीवनात कायम राहो!

(७ ) धुळवडीला कसलाही विचार न करता एकदम बिंदास रंग खेळा! लहान मुलांसारखं मनसोक्त एन्जॉय करा! धुळवडीच्या एकदम भारी शुभेच्छा!

(८ ) प्रत्येक रंगाचा एक नवीन अर्थ, एक नवीन अनुभव, आणि एक नवीन आनंद तुमच्यासाठी घेऊन येवो. धुळवडीच्या अनेक रंगांच्या शुभेच्छा!

(९ ) बालपणीच्या धुळवडीच्या आठवणींना उजाळा देऊया. त्या रंगात रमून, पुन्हा एकदा लहान होऊन, मनसोक्त खेळूया. धुळवडीच्या सोनेरी आठवणींच्या शुभेच्छा!

(० ) रंगांची सिम्फनी तुमच्या जीवनात गुंजू दे. प्रत्येक रंग एक नवीन सूर, एक नवीन लय, आणि एक नवीन आनंद घेऊन येवो. धुळवडीच्या सुरेल शुभेच्छा!

हे देखील पहा :

Leave a Comment