मराठी म्हणी व अर्थ || Mhani in Marathi Start from L V || Marathi Mhani Aani Arth


Mhani in Marathi Start from L V
मराठी भाषेत बोलली जाणारी “ल”,”” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

,”मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from L V (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Mhani in Marathi Start from L V

“लहान तोंडी मोठा घास. “

अर्थ: पात्रता नसताना मोठेपणाच्या गोष्टी बोलणे.

Meaning Of “लहान तोंडी मोठा घास. “ = Speaking grandiose things without qualification.

“लंकेत सोन्याच्या विटा. “

अर्थ: ज्या गोष्टींचा आपल्याला कोणताच उपयोग होत नाही अशी गोष्ट.

Meaning Of “लंकेत सोन्याच्या विटा. “ = Things that are of no use to us.

“लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही. “

अर्थ: धाका शिवाय शिस्त नाही.

Meaning Of “लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही. “ = There is no discipline without fear.

“लग्नाला गेली आणि बारशाला आली. “

अर्थ: अतिशय उशिराने पोहोचणे.

Meaning Of “लग्नाला गेली आणि बारशाला आली. “ = Arriving very late.

“लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस. “

अर्थ: मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक.

Meaning Of “लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस. “ = Subsidiary work costs more than the main work.

“लाज नाही मला कोणी काही म्हणा. “

अर्थ: निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही.

Meaning Of “लाज नाही मला कोणी काही म्हणा. “ = A shameless person does not care about the criticism of others.

“लाखाचे बारा हजार.”

अर्थ: मोठे नुकसान होणे.

Meaning Of “लाखाचे बारा हजार.” = Big loss.

“लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय काही खात नाही. “

अर्थ: उगाच मोठेपण्याच्या बाता मारणे.

Meaning Of “लाखाशिवाय बात नाही अन् वडापाव शिवाय काही खात नाही. “ = Talking too much when you have nothing of your own.

“लाथ मारेन तिथे पाणी काढीन. “

अर्थ: कर्तृत्वाने पुरुष कोठेही यशच मिळवितो.

Meaning Of “लाथ मारेन तिथे पाणी काढीन. “ = Through achievement, a man achieves success anywhere.

“लेकी बोले सुने लागे. “

अर्थ: एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

Meaning Of “लेकी बोले सुने लागे. “ = to say something with one target in mind, but it will affect another.

“लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. “

अर्थ: लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही.

Meaning Of “लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. “ = To preach to people but not to act like that.

“वरातीमागून घोडे.”

अर्थ: योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे.

Meaning Of “वरातीमागून घोडे.” = Working after the appropriate time has passed.

“वळणाचे पाणी वळणावर जाणे.”

अर्थ: निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार.

Meaning Of “वळणाचे पाणी वळणावर जाणे.” = As per the laws of nature, things that are meant to happen will happen.

“वाचेल तो वाचेल.”

अर्थ: वाचनाने ज्ञान वाढते आणि आपले आयुष्य समृद्ध होते.

Meaning Of “वाचेल तो वाचेल.” Reading increases knowledge and enriches our life.

“वाटण्याच्या अक्षता लावणे.”

अर्थ: कोणतेही काम न करणे किंवा होऊ न देणे.

Meaning Of “वाटण्याच्या अक्षता लावणे.” = Not to do or not to do any work.

“वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच.”

अर्थ: वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच.

Meaning Of “वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच.” = No matter if you call a bad person good or bad, he will still cause trouble.

“वारा पाहून पाठ फिरविणे.”

अर्थ: परिस्थिती पाहून वर्तन करणे.

Meaning Of “वारा पाहून पाठ फिरविणे.” = Behaving according to the situation.

“वासना तसे फळ.”

अर्थ: इच्छा तसे फळ.
चांगल्या इच्छे णे कोणतीही गोष्टं केली कि ती चांगलीच होते.

Meaning Of “वासना तसे फळ.” = A good will does anything that is good.

“वासरात लंगडी गाय शहाणी.”

अर्थ: मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो.

Meaning Of “वासरात लंगडी गाय शहाणी.” = A man of little knowledge is superior to a fool.

“वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे.”

अर्थ: सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे.

Meaning Of “वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे.” = If all means are favorable, take advantage of them.

“विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.”

अर्थ: गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.

Meaning Of “विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.” = Managing things for our own necessities.

“विचाराची तूट तेथे भाषणाला उत.”

अर्थ: मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते.

Meaning Of “विचाराची तूट तेथे भाषणाला उत.” = A crowd of fools is always just chatter.

“विद्वान सर्वत्र पूज्यते.”

अर्थ: ज्ञानी किंवा विद्वान माणसाची सर्वत्र पूजा होतेत्याला योग्य मान दिला जातो.

Meaning Of “विद्वान सर्वत्र पूज्यते.” = A wise or learned man is universally worshiped and given due respect.

“विद्याधनं सर्वधनं प्रधानं.”

अर्थ: सर्व धन संपत्ती मध्ये विद्याधन म्हणजेच ज्ञान हे सर्वश्रेष्ठ होय.

Meaning Of “विद्याधनं सर्वधनं प्रधानं.” = Knowledge is the best of all wealth.

“व्यक्ती तितक्या प्रकृती.”

अर्थ: प्रत्येकाच्या स्वभावछटा वेगवेगळ्या असतात.

Meaning Of “व्यक्ती तितक्या प्रकृती.” = Everyone has different temperaments.

“व्याप तितका संताप.”

अर्थ: जेवढी जबाबदारी अधिक तेवढी काळजी घ्यावी लागते.

Meaning Of “व्याप तितका संताप.” = The more responsibility, the more care you have to take.

“विशी विद्या तिशी धन.”

अर्थ: योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो.

Meaning Of “विशी विद्या तिशी धन.” = If the right work is done at the right time, then the performance can be estimated.

“विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी.”

अर्थ: विश्वासघात करणे.

Meaning Of “विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी.” = to betray

Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही “ल”,”“या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

Leave a Comment