मराठी म्हणी व अर्थ || Mhani in Marathi Start from Y R || Marathi Mhani Aani Arth

Mhani in Marathi Start from Y R मराठी भाषेत बोलली जाणारी ,”” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

,”मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from Y R (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Mhani in Marathi Start from Y R

“यथा राजा तथा प्रजा.”

अर्थ: श्रेष्ठ व्यक्‍तीचा प्रभाव सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीत दिसतो.

Meaning Of “यथा राजा तथा प्रजा.” = The influence of a great person can be seen in the behavior of common people.

“या बोटाची थुंकी त्या बोटावर.”

अर्थ: बनवाबनवी करणे,एका क्षणात आपले म्हणणे बदलणे व समोरच्याला अडचणीत आणणे.

Meaning Of “या बोटाची थुंकी त्या बोटावर.” = Changing your mind in a moment and putting the other person in trouble.

“या हाताचे त्या हातावर.”

अर्थ: वाईट कृत्याचे ताबडतोब फळ मिळते.

Meaning Of “या हाताचे त्या हातावर.” = Bad deeds are immediately rewarded.

“येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या.”

अर्थ: अनुभवाने पूर्व पदाला येणे.एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे.

Meaning Of “येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या.” = To act as before without listening to what someone preaches.

“यजमान सुस्त आणि चाकर मस्त.”

अर्थ: मालकाचे जर लक्ष नसेल तर नोकर माणसेही काम करीत नाही.

Meaning Of “यजमान सुस्त आणि चाकर मस्त.” = If the owner does not pay attention, the servants also do not work.

“यत्न जोड, आळस मोड.”

अर्थ: आळस सोडून काम करावे.

Meaning Of “यत्न जोड, आळस मोड.” = Leave laziness and work.

“ये रे कुत्र्या खा माझा पाय.”

अर्थ: आपण होऊन संकट ओढवून घेणे.

Meaning Of “ये रे कुत्र्या खा माझा पाय.” = bring about the crisis ourselve.

“राजाचे जाते अन् कोठावळ्याचे पोट दुखते.”

अर्थ: क्षुद्रवृत्तीच्या माणसाला दुसऱ्याचा उदारपणाही त्रासदायक होतो.

Meaning Of “राजाचे जाते अन् कोठावळ्याचे पोट दुखते.” = Even the generosity of others annoys a mean person.

“राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?”

अर्थ: नेहमी सुखातचैनीत राहणाऱ्यांना दिवस विशेष वाटत नाही.

Meaning Of “राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?” = Those who always live in comfort do not find the day special.

“रात्र थोडी अन् सोंग फार.”

अर्थ: कामे पुष्कळ आणि त्या मानाने वेळ थोडा.

Meaning Of “रात्र थोडी अन् सोंग फार.” = Lots of work and little time.

“रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.”

अर्थ: रिकामपणी निरर्थक उद्योग करणे.

Meaning Of “रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.” = To engage in idle futile enterprise.

“रोज मरे त्याला कोण रडे.”

अर्थ: वारंवार तीच गोष्ट घडण्याने तिच्यातील स्वारस्य जाते.

Meaning Of “रोज मरे त्याला कोण रडे.” = Repeating the same thing over and over loses interest in her.

“रंग जाणे रंगारी.”

अर्थ: ज्याची विद्या त्यालाच माहीत.

Meaning Of “रंग जाणे रंगारी.” = Whose knowledge only he knows.

“रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार.”

अर्थ: इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

Meaning Of “रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार.” = Unwillingness to assume responsibility.

“राईचा पर्वत करणे.”

अर्थ: मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे.

Meaning Of “राईचा पर्वत करणे.” = Turning molehills into mountains.

“रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत.”

अर्थ: मुख्य गोष्टीचा अभाव.

Meaning Of “रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत.” = Lack of the main thing.

Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही ,”” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

Leave a Comment