Mhani in Marathi Start from M मराठी भाषेत बोलली जाणारी “म” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“म“ मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from M (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Mhani in Marathi Start from M
“मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.”
अर्थ: कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
Meaning Of “मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.” = Don’t take advantage of anyone’s kindness.
“मन जाणे पाप आपण.”
अर्थ: केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच
Meaning Of “मन जाणे पाप आपण.” = Even if the other does not know the sin committed, he knows about it.
“मन राजा मन प्रजा.”
अर्थ: हुकुम करणारे आपले मन ते पाळणारे ही आपलेच मन असते
Meaning Of “मन राजा मन प्रजा.” = It is our mind that commands and our own mind that obeys.
“मन चिंती ते वैरी न चिंती.”
अर्थ: कधी कधी आपल्या मनात जेवढ्या वाईट गोष्टी येतात तेवढ्या शत्रूच्याही मनात येत नसतील.
Meaning Of “मन चिंती ते वैरी न चिंती.” = Sometimes,bad thoughts come to our minds that they don’t even come to the minds of our enemies.
“मनात मांडे पदरात धोंडे.”
अर्थ: केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती.
Meaning Of “मनात मांडे पदरात धोंडे.” = desires only grand , nothing substantial materializes in reality.
“मनाएवढी ग्याही त्रिभुवनात नाही.”
अर्थ: मनासारखा खरे सांगणारा साक्षीदार सा-या दुनियेत सापडणारा नाही.
Meaning Of “मनाएवढी ग्याही त्रिभुवनात नाही.” = A truthful witness like mind is not found in this world.
“मनी वसे ते स्वप्नी दिसे.”
अर्थ: ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे.
Meaning Of “मनी वसे ते स्वप्नी दिसे.” = Dreaming about things that we are constantly obsessing over.
“मनाची नाही, पण जनाची तरी ठेवावी.”
अर्थ: एखादी चूक केल्यावर दुस-यांच्या पुढे त्याची लाज तरी वाटावी.
Meaning Of “मनाची नाही, पण जनाची तरी ठेवावी.” = If you make a mistake, feel ashamed of it in front of others.
“मनात एक जनात एक.”
अर्थ: मनात एक गोष्ट असते, पण बाहेरून निरळीच दाखविली जाते.
Meaning Of “मनात एक जनात एक.” = There’s a thought in the mind, but it completely different when outwardly.
“मनात पाल चुकचुकणे.”
अर्थ: शंका येणे, संशय उत्पन्न होणे.
Meaning Of “मनात पाल चुकचुकणे.” = Doubts arise.
“मस्करीची होते कुस्करी.”
अर्थ: थट्टेचा परिणाम काही वेळा भयंकर होऊन त्याचे भांडणात रूपांतर होते.
Meaning Of “मस्करीची होते कुस्करी.” = The effect of teasing is sometimes dire and turns into a fight.
“मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही.”
अर्थ: “आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते.”
Meaning Of “मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही.” = Talking to parents is in the best interest of the child.
“माणकीस बोललं, झुणकीस लागलं.”
अर्थ: “एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे.”
Meaning Of “माणकीस बोललं, झुणकीस लागलं.” = Speaking to one person, another person gets affected.
“मानेवर गळू आणि पायाला जळू.”
अर्थ: रोग एकीकडे उपाय भलतीकडे.
Meaning Of “मानेवर गळू आणि पायाला जळू.” = Experiencing neck pain but applying remedies to the foot.
“मामुजी मेला अन् गांव गोळा झाला.”
अर्थ: क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे.
Meaning Of “मामुजी मेला अन् गांव गोळा झाला.” = To gloat over trifles.
“माकडाच्या हातात कोलीत.”
अर्थ: खोडकर माणसाला खोड्या करण्यासाठी उत्तेजन देणे.
Meaning Of “माकडाच्या हातात कोलीत.” = Encouraging a mischievous person to play pranks.
“मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.”
अर्थ: अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.
Meaning Of “मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.” = Wisdom does not come without experience.
“मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू.”
अर्थ: छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे.
Meaning Of “मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू.” = Getting carried away by even the smallest things.
“मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत.”
अर्थ: त्रासदायक मोठेपणापेक्षा सुखदायक छोटेपणा पत्कारणे चांगले.
Meaning Of “मुंगी होऊन साखर खावी, हत्ती होऊन लाकडे मोडू नयेत.” = It is better to bear a comforting smallness than a distressing largeness.
“मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची.”
अर्थ: दिसण्यात सोपी पण करण्यास अशक्य कृती.
Meaning Of “मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची.” = Simple in appearance but impossible to do.
“मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते.”
अर्थ: अंगी योग्य गुण असल्याशिवाय अनुकरण करणे अयोग्य.
Meaning Of “मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचते.” = It is inappropriate to imitate unless the right qualities.
“मरावे परी कीर्तीरुपे उरावे.”
अर्थ: माणसाची जर कर्मे चांगली असतील तर मेल्यानंतर सुद्धा त्याच्या कामासाठी लोकं त्याला कायम लक्षात ठेवतात.
Meaning Of “मरावे परी कीर्तीरुपे उरावे.” = If a person’s deeds are good, people will always remember him for his work.
“मुसळाला अंकुर फुटणे.”
अर्थ: अशक्य म्हणून मानली गेलेली गोष्ट घडून येणे.
Meaning Of “मुसळाला अंकुर फुटणे.” = Making the impossible happen.
“मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.”
अर्थ: लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते.
Meaning Of “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.” = A person’s defects are visible at an early age.
“मेल्या म्हशीला शेरभर दुध.”
अर्थ: गेलेल्या व्यक्तीची वाढवून स्तुती करणे.
Meaning Of “मेल्या म्हशीला शेरभर दुध.” = glorifying the persone who is not alive.
“मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते.”
अर्थ: मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ.
Meaning Of “मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते.” = The fight of fools and the benefit of the third.
“म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही.”
अर्थ: निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच.
Meaning Of “म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही.” = According to the laws of nature, the events that are supposed to happen happen.
Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही “म” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.