मराठी म्हणी व अर्थ || Mhani in Marathi Start from F B BH || Marathi Mhani Aani Arth

Mhani in Marathi Start from F B BH मराठी भाषेत बोलली जाणारी ““,”“,”” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

“,”“,” मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from F, B, BH (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?

What is Meaning Of this Marathi mhani ?

Mhani in Marathi Start from F,B,BH

“फार झाले हसू आले.”

अर्थ: दुःखाचा अतिरेक झाल्यावर खेदाची भावना बोथट होते.

Meaning Of “फार झाले हसू आले.” = Regret is blunted when grief is overdone.

“फासा पडेल तो डाव , राजा बोलेल तो न्याय.”

अर्थ: राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो.

Meaning Of “फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय.” = Even if the justice given by the king is against the mind or wrong, it has to be accepted

“फुटका डोळा काजळाने साजरा करावा.”

अर्थ: आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा.

Meaning Of “फुटका डोळा काजळाने साजरा करावा.” = The defect of your body which cannot be removed should be covered as much as possible.

“फुल ना फुलाची पाकळी.”

अर्थ: वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.

Meaning Of “फुल ना फुलाची पाकळी.” = Giving much less than the actual amount due to not having the strength to give.

“फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे.”

अर्थ: जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे.

Meaning Of “फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे.” = Where you experience joy, there your bad days’ fate comes.

“बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना.”

अर्थ: निरुपयोगी गोष्ट.

Meaning Of “बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना.” = Useless thing.

“बडा घर पोकळ वासा.”

अर्थ: दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव.

Meaning Of “बडा घर पोकळ वासा.” = Apparent wealth but lack of it in reality

“बळी तो कान पिळी.”

अर्थ: बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो.

Meaning Of “बळी तो कान पिळी.” = A strong man dominates others.

“बाप तसा बेटा.”

अर्थ: बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.

Meaning Of “बाप तसा बेटा.” = The qualities of the father’s body descend into the child.

“बाप से बेटा सवाई.”

अर्थ: वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगारT.

Meaning Of “बाप से बेटा सवाई.” = he son is more efficient than the father.

“बारक्या फणसाला म्हैस राखण.”

अर्थ: ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे.

Meaning Of “बारक्या फणसाला म्हैस राखण.” = Delegating the responsibility of protection to the person from whom the threat is posed.

“बावळी मुद्रा देवळी निद्रा.”

अर्थ: दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस.

Meaning Of “बावळी मुद्रा देवळी निद्रा.” = A man who looks ugly but is practical.

“बुडत्याला काडीचा आधार.”

अर्थ: घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते.

Meaning Of “बुडत्याला काडीचा आधार.” = Even a small amount of help is important in times of dire crisis.

“बैल गेला आणि झोपा केला.”

अर्थ: एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.

Meaning Of “बैल गेला आणि झोपा केला.” = When something happens, the arrangements made to remedy it become futile.

“बोडकी आली व केस कर झाली.”

अर्थ: विधवा आली अन लग्न लावून गेली.

Meaning Of “बोडकी आली व केस कर झाली.” = A widow came and got married.

“बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?”

अर्थ: केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.

Meaning Of “बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?” = Nothing can be done by a mere chatterer.

“भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी.”

अर्थ: एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.

Meaning Of “भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी.” = If someone is given shelter, he tries to get more benefit without being satisfied with it.

“भरवशाच्या म्हशीला टोणगा.”

अर्थ: ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे.

Meaning Of “भरवशाच्या म्हशीला टोणगा.” = Being betrayed by the very person you trust the most.

“भागीचे घोडे की किवणाने मेले.”

अर्थ: भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही.

Meaning Of “भागीचे घोडे की किवणाने मेले.” = Everyone takes advantage of this thing in partnership but nobody cares.

“भिंतीला कान असतात.”

अर्थ: गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही.

“भिंतीला कान असतात.” = Secrets don’t stay hidden forever.

“भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री.”

अर्थ: व्यक्ती काही कारण नसताना भीत असते.

Meaning Of “भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री.” = A person is afraid without any reason.

“भीक नको पण कुत्रा आवर.”

अर्थ: एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती.

Meaning Of “भीक नको पण कुत्रा आवर.” = A condition that if not in one’s mind should not help but at least not hinder one’s work.

“भीड भिकेची बहीण.”

अर्थ: उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे.

Meaning Of “भीड भिकेची बहीण.” = If we can’t refuse someone out of sheer fear, it’s finally our turn to beg.

या पोस्ट मध्ये आम्ही ““,”“,”” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

Leave a Comment