Mhani in Marathi Start from Y R मराठी भाषेत बोलली जाणारी “य“,”र” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“य“,”र” मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from Y R (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Mhani in Marathi Start from Y R
“यथा राजा तथा प्रजा.”
अर्थ: श्रेष्ठ व्यक्तीचा प्रभाव सर्वसामान्य माणसांच्या वागणुकीत दिसतो.
Meaning Of “यथा राजा तथा प्रजा.” = The influence of a great person can be seen in the behavior of common people.
“या बोटाची थुंकी त्या बोटावर.”
अर्थ: बनवाबनवी करणे,एका क्षणात आपले म्हणणे बदलणे व समोरच्याला अडचणीत आणणे.
Meaning Of “या बोटाची थुंकी त्या बोटावर.” = Changing your mind in a moment and putting the other person in trouble.
“या हाताचे त्या हातावर.”
अर्थ: वाईट कृत्याचे ताबडतोब फळ मिळते.
Meaning Of “या हाताचे त्या हातावर.” = Bad deeds are immediately rewarded.
“येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या.”
अर्थ: अनुभवाने पूर्व पदाला येणे.एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे.
Meaning Of “येरे माझ्या मागल्या, ताककण्या चांगल्या.” = To act as before without listening to what someone preaches.
“यजमान सुस्त आणि चाकर मस्त.”
अर्थ: मालकाचे जर लक्ष नसेल तर नोकर माणसेही काम करीत नाही.
Meaning Of “यजमान सुस्त आणि चाकर मस्त.” = If the owner does not pay attention, the servants also do not work.
“यत्न जोड, आळस मोड.”
अर्थ: आळस सोडून काम करावे.
Meaning Of “यत्न जोड, आळस मोड.” = Leave laziness and work.
“ये रे कुत्र्या खा माझा पाय.”
अर्थ: आपण होऊन संकट ओढवून घेणे.
Meaning Of “ये रे कुत्र्या खा माझा पाय.” = bring about the crisis ourselve.
“राजाचे जाते अन् कोठावळ्याचे पोट दुखते.”
अर्थ: क्षुद्रवृत्तीच्या माणसाला दुसऱ्याचा उदारपणाही त्रासदायक होतो.
Meaning Of “राजाचे जाते अन् कोठावळ्याचे पोट दुखते.” = Even the generosity of others annoys a mean person.
“राजाला दिवाळी काय ठाऊक?”
अर्थ: नेहमी सुखातचैनीत राहणाऱ्यांना दिवस विशेष वाटत नाही.
Meaning Of “राजाला दिवाळी काय ठाऊक?” = Those who always live in comfort do not find the day special.
“रात्र थोडी अन् सोंग फार.”
अर्थ: कामे पुष्कळ आणि त्या मानाने वेळ थोडा.
Meaning Of “रात्र थोडी अन् सोंग फार.” = Lots of work and little time.
“रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.”
अर्थ: रिकामपणी निरर्थक उद्योग करणे.
Meaning Of “रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.” = To engage in idle futile enterprise.
“रोज मरे त्याला कोण रडे.”
अर्थ: वारंवार तीच गोष्ट घडण्याने तिच्यातील स्वारस्य जाते.
Meaning Of “रोज मरे त्याला कोण रडे.” = Repeating the same thing over and over loses interest in her.
“रंग जाणे रंगारी.”
अर्थ: ज्याची विद्या त्यालाच माहीत.
Meaning Of “रंग जाणे रंगारी.” = Whose knowledge only he knows.
“रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार.”
अर्थ: इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.
Meaning Of “रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार.” = Unwillingness to assume responsibility.
“राईचा पर्वत करणे.”
अर्थ: मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे.
Meaning Of “राईचा पर्वत करणे.” = Turning molehills into mountains.
“रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत.”
अर्थ: मुख्य गोष्टीचा अभाव.
Meaning Of “रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत.” = Lack of the main thing.
Marathi Mhani च्या या पोस्ट मध्ये आम्ही “य“,”र” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.