Gudi Padwa Wishes in Marathi || गुढी पाडवा शुभेच्छा ||

Gudi Padwa Wishes in Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Greetings Festival | गुढीपाडवा | gudipadwa | गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Gudi Padwa Chya Hardik Shubhechha in Marath |

श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन!

गुढीपाडवा:

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते.

असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. याच दिवशी शालिवाहन शक सुरू झाले. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून अयोध्येत प्रवेश केला, तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Gudi Padwa Wishes in Marathi || गुढी पाडवा शुभेच्छा ||

गुढी पाडव्यानिमित्त या खास शुभेच्छा तुम्ही Gudi Padwa Wishes in Marathi Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता:

(१ ) चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…नूतन वर्षाभिनंदन!

(३ ) वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गायी मंजुळ गाणी, नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला, कोकिळेच्या सुरवातीसोबत, चैत्र “पाडवा” दारी आला… नूतन वर्षाभिनंदन!

(५ ) सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट.. आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात… गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

(६ ) निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी… नवे नवे वर्ष आले घेऊन गुळासाखरेची गोडी… गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.

(७ ) नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नव वर्षाच्या स्वागताची ही तर पारंपारिक रूढी, रचल्या रांगोळ्या दारोदारी नटले सारे अंगण, प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन सुगंधीत जसे चंदन… नूतनवर्षाभिनंदन!!

(८ ) चंदनाच्या काठीवर, शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) मंगलमय गुढी..लेऊनी भरजरी खण..आनंदाने साजरा करा पाडव्याचा सण.

(१० ) श्रीखंड पूरी, रेशमी गुढी, लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान. नूतन वर्षाभिनंदन!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ( Gudi Padwa Wishes in Marathi )

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश:

(१ ) नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा…नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

(२ ) गुढी उभारू आनंदाची, समृद्धीची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची, नव वर्षाच्या शुभेच्छा!

(३ ) उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, तुम्हाला नववर्षानिमित्त शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा.

(५ ) हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी, तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

(७ ) आयुष्य एक वीणा आणि सूर भावनांचे गाऊया धुंद मग्न होऊन संगीत हिंदू नववर्षाचे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी… गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) प्रसन्नतेचा साज घेऊन,यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.

(२० ) नूतन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण कुटुंबाला लक्षलक्ष शुभेच्छा.

गुढी पाडवा शुभेच्छा

Gudi Padwa Chya Hardik Shubhechha in Marathi:

(१ ) तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

(२ ) गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(३ ) सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष, येणारा नवीन दिवस करेल नव्या विचारांना स्पर्श, हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) नवीन दिशा, खुप आशा, नवीन सकाळ, सुंदर विचार, नवीन आनंद, मन बेधुंद, आज सुरु होते, शुभ नवीन वर्ष.

(५ ) वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती, नव्या वर्षी नव्या भेटी, नव्या क्षणाशी नवी नाती, नवी पहाट तुमच्यासाठी, शुभेच्छांची गाणी गाती! गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) दुःख सारे विसरुन जाऊ, सुख देवाच्या चरनी वाहू, स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी, नव्या नजरेने नव्याने पाहू… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(७ ) शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(८ ) सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोन्यासारख्या लोकांना. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(९ ) या वर्षी मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणार नाही तर तिघांना तुमच्याकडे पाठवणार आहे. ते म्हणजे सुख, शांती आणि समृद्धी…!!! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

(३० ) एकनिष्ठ…कट्टर…मग येतात, नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देणारे.

गुढी कशी उभी करतात?

बांबूची काठी स्वच्छ धुऊन घ्यावी. काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र बांधावे. वस्त्रावर तांब्याचा किंवा चांदीचा लोटा ठेवावा. गुढीला कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने आणि फुलांची माळ बांधावी. गुढी दाराजवळ उंच ठिकाणी उभी करावी. गुढीची पूजा करून तिला गोड नैवेद्य दाखवावा.

साडेतीन शुभ मुहूर्त कोणते ?

हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत. तर “दिवाळीचा पाडवा” कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे.

हे देखील पहा :
  • लग्नाच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा मराठीत || Anniversary Wishes in Marathi ||

[icegram campaigns=”1555″]

Leave a Comment