Shiv Jayanti Wishes in Marathi || छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ||

Shiv Jayanti Wishes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी | Shiv Jayanti Wishes 2025 | | छत्रपती शिवाजी महाराज जयंती | Shiv Jayanti Wishes |छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा |

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवजयंती:

शिवाजी महाराजांचा जन्मदिन म्हणजे शिवजयंती. हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस असतो. शिवाजी महाराजांच्या शौर्या, बुद्धिमत्ते आणि देशभक्तीला वंदन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे.

शिवाजी जयंतीची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांनी समाज सुधारणेच्या उद्देशाने आणि लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय एकतेच्या दृष्टिकोनातून केली होती. आजही शिवजयंती ही महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. मात्र, त्यांच्या जन्म तारखेबाबत इतिहासकारांमध्ये काही मतभेद आहेत. काही जण ६ एप्रिल १६२७ ही तारीख मानतात. या मतभेदाचे कारण शिवकालीन कागदपत्रांची उपलब्धता आणि ती तपासण्यातील अडचणी असाव्यात. तरीही, ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार १९ फेब्रुवारी हा दिवस अधिकृतपणे शिवजयंती म्हणून साजरा केला जातो.

शिवजयंतीच्या दिवशी, लोक शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना फुले वंदन करतात, मंदिरांमध्ये विशेष पूजा करतात आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित नाटकं, कार्यक्रम आणि प्रदर्शने पाहतात. शाळा-कॉलेजांमध्ये विद्यार्थी शिवरायांच्या जीवनावर आधारित नाटकं सादर करतात, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. शिवरायांच्या विचारांचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे.

Shiv Jayanti Wishes in Marathi

Shiv Jayanti Wishes in Marathi || छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! ||

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन म्हणजेच शिवजयंतीच्या खास शुभेच्छा (Shiv Jayanti Wishes in Marathi), तुम्ही Text, Sms द्वारे Whatsapp व इतर सोशल मीडिया वर Copy Past करून मित्रमंडळीना पाठऊ शकता: #छत्रपतीशिवाजीमहाराज

(१ ) एक मराठा लाख मराठा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

(२ ) प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस.. सिहांसनाधीश्वर.. योगीराज.. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

(३ ) अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्ति स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे यांना मनाचा मुजरा. शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा!

(४ ) महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

(५ ) श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग… देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ….शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(६ ) ताठ होतील माना.. उंच होतील नजरा… या रयतेच्या राजाला.. मानाचा मुजरा. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

  • Chhatrapati Shivaji Maharaj statue for gift, car dash board and desk decoration Material: Made of Fine Grade polyurethan…
  • Material: Made of Fine Grade polyurethane resin high detail
  • Colour: black mat , copper mat, gold mat

(७ ) सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा!

(८ ) तलवारीच्या टणत्काराने इतिहास घडवला, मावळ्यांच्या जिद्दीने स्वराज्य फुलवले! स्वराज्याचा अभिमान जागवूया, शिवरायांचे विचार रुजवूया! शिवजयंतीच्या शुभेच्छा!

(९ ) छाती होती पोलादी ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार, त्या माझ्या शिवबांचा आज सर्वे करती जयजयकर, करती जयजयकर. शिवजयंतीच्या शुभेच्छा!

(० ) शूरवीरांची आहे ही धरती, वीर शिवाजी राजे पालनहार.. मावळ्यांच्या मनात जागवला अभिमान, असा हा राजा छत्रपती महाराष्ट्राची शान.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! || Shiv Jayanti Wishes in Marathi ||

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!( Chhatrapati Shivaji Maharaj, Shiv Jayanti Wishes in Marathi )

(१ ) सिंह गर्जनांचा नाद दुमदुमू दे, स्वराज्याचा विजयघोष आसमंतात घुमू दे, छत्रपतींचा विचार मनामनात रुजू दे! शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

(१२ ) इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर, मातिच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१३ ) प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले, धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१४ ) पावित्र्य तव राखिले स्वराज्यस्वप्न तव साकारिले… गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराजा तूज मानाचा मुजरा…

(१५ ) निधड्या छातीचा, दणकट कणांचा, मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा…शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१६ ) रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं, पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच -छत्रपती शिवराय! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१७ ) बीज अंगी लखलखके ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माथी चमकते ज्याच्या तो मर्द मराठा. भीमरूपी महाकाय जणू तो शोभे मर्द मराठा, माय भू तुला पुत्र म्हणूनी लाभे मर्द मराठा… शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(१८ ) अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अफजल खान फार झाले आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला! शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

(१९ ) स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास, रयतेचे सुख ही एकच मनी होती आस, मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

(२० ) यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

#छत्रपतीशिवाजीमहाराज #ShivJayanti #ShivJayantiWishesinMarathi #छत्रपतीशिवाजीमहाराजजयंतीशुभेच्छा #शुभेच्छा #Wishes

हे देखील पहा :

Leave a Comment