Mhani in Marathi Start from F B BH मराठी भाषेत बोलली जाणारी “फ“,”ब“,”भ” या मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील.
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
“फ“,”ब“,”भ“ मूळाक्षर पासूण सुरु होणारी मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from F, B, BH (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे ?
What is Meaning Of this Marathi mhani ?
Mhani in Marathi Start from F,B,BH
“फार झाले हसू आले.”
अर्थ: दुःखाचा अतिरेक झाल्यावर खेदाची भावना बोथट होते.
Meaning Of “फार झाले हसू आले.” = Regret is blunted when grief is overdone.
“फासा पडेल तो डाव , राजा बोलेल तो न्याय.”
अर्थ: राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो.
Meaning Of “फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय.” = Even if the justice given by the king is against the mind or wrong, it has to be accepted
“फुटका डोळा काजळाने साजरा करावा.”
अर्थ: आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा.
Meaning Of “फुटका डोळा काजळाने साजरा करावा.” = The defect of your body which cannot be removed should be covered as much as possible.
“फुल ना फुलाची पाकळी.”
अर्थ: वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे.
Meaning Of “फुल ना फुलाची पाकळी.” = Giving much less than the actual amount due to not having the strength to give.
“फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे.”
अर्थ: जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे.
Meaning Of “फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे.” = Where you experience joy, there your bad days’ fate comes.
“बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना.”
अर्थ: निरुपयोगी गोष्ट.
Meaning Of “बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना.” = Useless thing.
“बडा घर पोकळ वासा.”
अर्थ: दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव.
Meaning Of “बडा घर पोकळ वासा.” = Apparent wealth but lack of it in reality
“बळी तो कान पिळी.”
अर्थ: बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो.
Meaning Of “बळी तो कान पिळी.” = A strong man dominates others.
“बाप तसा बेटा.”
अर्थ: बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे.
Meaning Of “बाप तसा बेटा.” = The qualities of the father’s body descend into the child.
“बाप से बेटा सवाई.”
अर्थ: वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगारT.
Meaning Of “बाप से बेटा सवाई.” = he son is more efficient than the father.
“बारक्या फणसाला म्हैस राखण.”
अर्थ: ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे.
Meaning Of “बारक्या फणसाला म्हैस राखण.” = Delegating the responsibility of protection to the person from whom the threat is posed.
“बावळी मुद्रा देवळी निद्रा.”
अर्थ: दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस.
Meaning Of “बावळी मुद्रा देवळी निद्रा.” = A man who looks ugly but is practical.
“बुडत्याला काडीचा आधार.”
अर्थ: घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते.
Meaning Of “बुडत्याला काडीचा आधार.” = Even a small amount of help is important in times of dire crisis.
“बैल गेला आणि झोपा केला.”
अर्थ: एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
Meaning Of “बैल गेला आणि झोपा केला.” = When something happens, the arrangements made to remedy it become futile.
“बोडकी आली व केस कर झाली.”
अर्थ: विधवा आली अन लग्न लावून गेली.
Meaning Of “बोडकी आली व केस कर झाली.” = A widow came and got married.
“बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?”
अर्थ: केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही.
Meaning Of “बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?” = Nothing can be done by a mere chatterer.
“भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी.”
अर्थ: एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.
Meaning Of “भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी.” = If someone is given shelter, he tries to get more benefit without being satisfied with it.
“भरवशाच्या म्हशीला टोणगा.”
अर्थ: ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे.
Meaning Of “भरवशाच्या म्हशीला टोणगा.” = Being betrayed by the very person you trust the most.
“भागीचे घोडे की किवणाने मेले.”
अर्थ: भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही.
Meaning Of “भागीचे घोडे की किवणाने मेले.” = Everyone takes advantage of this thing in partnership but nobody cares.
“भिंतीला कान असतात.”
अर्थ: गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही.
“भिंतीला कान असतात.” = Secrets don’t stay hidden forever.
“भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री.”
अर्थ: व्यक्ती काही कारण नसताना भीत असते.
Meaning Of “भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री.” = A person is afraid without any reason.
“भीक नको पण कुत्रा आवर.”
अर्थ: एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती.
Meaning Of “भीक नको पण कुत्रा आवर.” = A condition that if not in one’s mind should not help but at least not hinder one’s work.
“भीड भिकेची बहीण.”
अर्थ: उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे.
Meaning Of “भीड भिकेची बहीण.” = If we can’t refuse someone out of sheer fear, it’s finally our turn to beg.
या पोस्ट मध्ये आम्ही “फ“,”ब“,”भ” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता.

‘मराठी प्रेमी’ हे नाव घेऊन मी, “अजय उपरीकर”, २०१८ पासून दर्जेदार मराठी साहित्य, शुभेच्छा संदेश, आणि सांस्कृतिक लेखन करत आहे. मी एक अनुभवी मराठी कंटेंट लेखक आहे आणि मराठी birthday wishes या विषयावर मी विविध लेख वर्तमानपत्रांसाठी लिहिले आहेत.
‘marathipremi.in’ ही माझी वेबसाइट आहे, जी खास मराठी वाचकांसाठी तयार केली आहे. येथे तुम्हाला सुंदर मराठी quotes, wishes, आणि images यांचा समृद्ध संग्रह मिळेल. या प्लॅटफॉर्मवर मी भावनिक, साहित्यिक, आणि सामाजिक विषयांवर आधारित दर्जेदार व मौलिक लेख सादर करत असतो.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि वाचकांपर्यंत शुद्ध, समर्पक आणि मनाला भावणारी माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे.