मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||

मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: || Mhani in Marathi ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“गरजवंताला अक्कल नसते.”

अर्थ: गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.

Meaning Of “गरजवंताला अक्कल नसते.”=A person who is stuck due to necessity has to bow his head to what others say.

“गर्वाचे घर खाली.”

अर्थ: गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.

Meaning Of “गर्वाचे घर खाली.”=A proud man is sometimes fooled.

“गरज सरो नि वैध मरो.”

अर्थ: आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.

Meaning Of “गरज सरो नि वैध मरो.”=Not caring about the benefactor once your work is done.

“गर्जेल तो पडेल काय.”

अर्थ: केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.

Meaning Of “गर्जेल तो पडेल काय.”=Not much gets done by a mere blabbermouth.

“गाढवाला गुळाची चव काय?”

अर्थ: मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.

Meaning Of “गाढवाला गुळाची चव काय?”=A fool does not know the value of a good thing.

“गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ.”

अर्थ: मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.

Meaning Of “गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ.”=When stupid people get together, they will do stupid things.

“गाव करी ते राव ना करी.”

अर्थ: श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.

Meaning Of “गाव करी ते राव ना करी.”=A wealthy person can do on their own strength what an ordinary person can do with unity.

“गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.”

अर्थ: मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.

Meaning Of “गाड्याबरोबर नळ्याची यात्रा.”=Even the little ones benefit under the shelter of the mighty.

“गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता.”

अर्थ: मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.

Meaning Of “गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता.”=The advice given to a fool goes in vain.

“गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली.”

अर्थ: एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.

Meaning Of “गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली.”=If one plan doesn’t succeed, it’s either excellent or there’s an opportunity for another use.

“गाढवाच्या पाठीवर गोणी.”

अर्थ: एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.

Meaning Of “गाढवाच्या पाठीवर गोणी.”=Sometimes, a story may not be useful, but there is an advantage in finding its benefit.

“गुरुची विद्या गुरूला फळली.”

अर्थ: एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.

Meaning Of “गुरुची विद्या गुरूला फळली.”=To turn one’s game against oneself.

“गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.”

अर्थ: ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.

Meaning Of “गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य.”=To give someone what belongs to them.

“गोगलगाय नि पोटात पाय.”

अर्थ: एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.

Meaning Of “गोगलगाय नि पोटात पाय.”=Not seeing one’s true nature.

“गोरागोमटा कपाळ करंटा.”

अर्थ: दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.

Meaning Of “गोरागोमटा कपाळ करंटा.”=A person who is handsome in appearance but unfortunate in fortune.

“ग ची बाधा झाली.”

अर्थ: गर्व चढणे.

Meaning Of “ग ची बाधा झाली.”=Inflated Ego

“घर ना दार देवळी बिर्‍हाड.”

अर्थ: बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.

Meaning Of “घर ना दार देवळी बिर्‍हाड.=A single man without a wife or children or a person without any responsibilities.

“घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.”

अर्थ: एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.

Meaning Of “घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.”=If someone is in an unfavorable situation, everyone starts treating him badly.

“घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे.”

अर्थ: स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे.

Meaning Of “घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे.”=While engrossed in one’s own work, others burden you with their tasks as well.

“घर पहावे बांधून लग्न पहावे करून.”

अर्थ: अनुभवाने माणूस शहाणा होतो.

Meaning Of “घर पहावे बांधून लग्न पहावे करून.”=A man becomes wise with experience.

“घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते.”

अर्थ: आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.

Meaning Of “घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते.”=One has to suffer the consequences according to one’s karma.

“घरोघरी मातीच्याच चुली.”

अर्थ: सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.

Meaning Of “घरोघरी मातीच्याच चुली.”=Experiencing the same situation everywhere.

“घोडे खाई भाडे.”

अर्थ: धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.

Meaning Of “घोडे खाई भाडे.”=Costs outweigh the benefits in business.

Leave a Comment