मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व क ते ख पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .
म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी ” म्हणी ” या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: || Mhani in Marathi ||Marathi Mhani Aani Arth|| (मराठी व English मध्ये )
या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?
“ कर नाही त्याला डर कशाला.”
अर्थ: ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे.
Meaning Of “ कर नाही त्याला डर कशाला.”=One who has not committed any crime or bad thing should fear punishment.
“ कामापुरता मामा ताकापुरती आजी.”
अर्थ: आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.
Meaning Of “ कामापुरता मामा ताकापुरती आजी.”=Sweet talking to someone until you get your work done.
“ काळ आला होता. पण वेळ आली नव्हती.”
अर्थ: नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात वाचणे.
Meaning Of “ काळ आला होता. पण वेळ आली नव्हती.”=A brief escape when it’s time to perish.
“ कानामगून आली आणि तिखट झाली.”
अर्थ: मागून येऊन वरचढ होणे.
Meaning Of “ कानामगून आली आणि तिखट झाली.”=Coming up from behind.
“ करावे तसे भरावे.”
अर्थ: जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
Meaning Of “ करावे तसे भरावे.”=One has to bear the good and bad results according to the action.
“ कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी.”
अर्थ: कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
Meaning Of “ कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी.”=Sometimes poverty and sometimes wealth.
“ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ.”
अर्थ: आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो.
Meaning Of “ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ.”=Our own man is the cause of our destruction.
“ काठी मारल्याने पानी दुभंगत नाही.”
अर्थ: रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही.
Meaning Of “ काठी मारल्याने पानी दुभंगत नाही.”=Blood relation is not broken by breaking it.
“ कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच.”
अर्थ: किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही.
Meaning Of “ कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच.”=No matter how much one tries one’s basic nature (durvartani) does not change.
“ कुडी तशी पुडी.”
अर्थ: देहाप्रमाणे आहार असतो.
Meaning Of “ कुडी तशी पुडी.”=Diet varies according to the body.
“ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.”
अर्थ: स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.
Meaning Of “ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.”=Harming one’s man by helping the enemy with an evil mind for selfish gain.
“कधी तुपाशी तर कधी उपाशी.”
अर्थ: संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
Meaning Of “ कधी तुपाशी तर कधी उपाशी.”=The worldly condition is not always the same, sometimes there is prosperity and sometimes there is poverty.
“ कावळा बसायला अन फांदी तुटायला.”
अर्थ: (परस्परांशी कारण-संबंध नसताना) योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
Meaning Of “ कावळा बसायला अन फांदी तुटायला.”=Coincidentally two things happen at the same time.
“ कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.”
अर्थ: कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही.
Meaning Of “ कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच.”=No matter how hard you try, the original nature of something does not change.
“ कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे.”
अर्थ: रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
Meaning Of “ कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे.”=To steal by betraying the keeper himself.
“ कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा.”
अर्थ: दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो;
आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
Meaning Of “ कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा.”=A person who surrenders to others forgets his opinions
“ कोल्हा काकडीला राजी.”
अर्थ: क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
Meaning Of “ कोल्हा काकडीला राजी.”=Small people are happy with small things.
“ कोरड्याबरोबर ओले ही जळते.”
अर्थ: निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे.
Meaning Of “ कोरड्याबरोबर ओले ही जळते.”=Counting the innocent with the guilty.
“ कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी.”
अर्थ: महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.
Meaning Of “ कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी.”=Comparing trivial things with great things.
“ कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.”
अर्थ: निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही.
Meaning Of “ कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही.”=A certain event cannot be avoided by anyone’s efforts.
“ कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी.”
अर्थ: चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला.
Meaning Of “ कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी.”=One’s mistake is another’s punishment
“ काखेत कळसा नि गावाला वळसा.”
अर्थ: हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
Meaning Of “ काखेत कळसा नि गावाला वळसा.”=Looking elsewhere even when the lost object is near.
“ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.”
अर्थ: क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
Meaning Of “ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.”=The great ones are not harmed by the mistakes made by the petty people.
“ काल महिला आणि आज पितर झाला.”
अर्थ: अतिशय उतावळेपणाची वृत्ती.
Meaning Of “ काल महिला आणि आज पितर झाला.”=Very rash attitude.
“ कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.”
अर्थ: पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.
Meaning Of “ कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.”=Having a prejudiced vision.
“ केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले.”
अर्थ: एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.
Meaning Of “ केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले.”=Benefiting from something is fun, but giving money is life-threatening.
“ कोळसा उगाळावा तितका काळाच.”
अर्थ: वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.
Meaning Of “ कोळसा उगाळावा तितका काळाच.”=The more a bad thing is discussed, the worse it becomes.
“ केळीला नारळी अन घर चंद्रमौळी.”
अर्थ: अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.
Meaning Of “ केळीला नारळी अन घर चंद्रमौळी.”=A state of extreme poverty.
“ केस उपटल्याने का मढे हलके होते ?”
अर्थ: जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.
Meaning Of “ केस उपटल्याने का मढे हलके होते ?”= Small solutions do nothing where big of solutions are needed.
“ खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते.”
अर्थ: खर्च करणार्याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.
Meaning Of “ खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते.”=A spender spends; It is acceptable to him; But someone else grumbles about it.
“ खाई त्याला खवखवे.”
अर्थ: जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.
Meaning Of “ खाई त्याला खवखवे.”=He who does bad deeds feels fear in his heart.
“ खाण तशी माती.”
अर्थ: आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
Meaning Of “ खाण तशी माती.”=Children Behaving like their parents.
“ खायला काळ भुईला भार.”
अर्थ: निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.
Meaning Of “ खायला काळ भुईला भार.”=A useless man burdens everyone.
“ खर्याला मरण नाही.”
अर्थ: खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते !
Meaning Of “ खर्याला मरण नाही.”=Truth never hides, Satya Mev Jayate!
“ खाऊ जाणे ते पचवू जाणे.”
अर्थ: एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
Meaning Of “खाऊ जाणे ते पचवू जाणे.”=One who dares to do an act is also capable of suffering its consequences.
“ खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.”
अर्थ: परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.
Meaning Of “ खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी.”=Stubborn without adapting to the situation.
“ खाऊन माजवे टाकून माजू नये.”
अर्थ: पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
Meaning Of “ खाऊन माजवे टाकून माजू नये.”=Don’t misuse money wealth.
“ खोट्याच्या कपाळी गोटा.”
अर्थ: वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
Meaning Of “ खोट्याच्या कपाळी गोटा.”=The one who does bad actions ultimately turns to be bad.