मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||Marathi Mhani idioms

Marathi Mhani मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from dh and N (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे? what is Meaning Of this Marathi Mhani ?

“धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी.”

अर्थ: कोणत्याच कामाचे नसणे.

Meaning Of “धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी.”=Being of no use.

“धर्म करता कर्म उभे राहते.”

अर्थ: एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

Meaning Of “धर्म करता कर्म उभे राहते.”=Doing a good thing often leads to undesirable consequences.

“धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा.”

अर्थ: छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.

Meaning Of “धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा.”=Taking care of the little things but neglecting the big things.

“धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या.”

अर्थ: गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.

Meaning Of “धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या.”=Rich people get work immediately while poor people have to travel.

“न कर्त्याचा वार शनिवार.”

अर्थ: एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.

Meaning Of “न कर्त्याचा वार शनिवार.”=A person who does not want to do something from his heart avoids it on some pretext.

“नव्याचे नऊ दिवस.”

अर्थ: कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.

Meaning Of “नव्याचे नऊ दिवस.”=The novelty of anything lasts for a while and its importance fades with time.

“नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.”

अर्थ: दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात.

Meaning Of “नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.”=There are many similar obstacles in the way of defective workers

“नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये.”

अर्थ: नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.

Meaning Of “नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये.”=Do not look at the source of the river and the descent of the sage because there is something wrong with it.

“नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.”

अर्थ: केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार.
उपदेशाचा शून्य परिणाम होणे.

Meaning Of “नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे.”=A sermon has no effect.

“नाक दाबले, की तोंड उघडते.”

अर्थ: एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.

Meaning Of “नाक दाबले, की तोंड उघडते.”=Knowing a man’s worm and applying pressure to it in the right direction, one can get the job done instantly in a pinch.

“नाकापेक्षा मोती जड.”

अर्थ: मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे. मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे

Meaning Of “नाकापेक्षा मोती जड.”=The rise of the servant’s dignity over the master’s.

“नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला.”

अर्थ: आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.

Meaning Of “नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला.”=Reaching out to those who are already in need.

“नागिन पोसली आणि पोसणाराला डसली.”

अर्थ: वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच

Meaning Of “नागिन पोसली आणि पोसणाराला डसली.”=If you keep a bad thing with you, it sometimes backfire.

“नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे.”

अर्थ: एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.

Meaning Of “नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे.”=Donating from the loot to another.

“नाचता येईना अंगण वाकडे.”

अर्थ: आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.

Meaning Of “नाचता येईना अंगण वाकडे.”=When you can’t do a job, you blame something to hide your weakness.

“नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे.”

अर्थ: देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.

Meaning Of “नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे.”=Protecting selfishness in the name of God.

“नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.”

अर्थ: नाव मोठे पण कर्तबगारी शून्य.

Meaning Of “नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा.”=The name is big but the performance is zero.

” नावडतीचे मीठ आळणी.”

अर्थ: नावडतीचे मीठ आळणी आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते.

Meaning Of ” नावडतीचे मीठ आळणी.”=No matter how good the person against us is, we see it as bad.

“निंदकाचे घर असावे शेजारी.”

अर्थ: निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात.

Meaning Of “निंदकाचे घर असावे शेजारी.”=A slanderer is useful because he knows his faults.

“नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन.”

अर्थ: अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे.

Meaning Of “नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन.”=Behaving very stubbornly.

या पोस्ट मध्ये आम्ही “” ते “” या मूळाक्षरा वरील मराठी म्हणी एकत्रित पणे देण्याचा प्रयत्न केला आहे . तुम्ही तुम्हाला माहीत असलेल्या मराठी म्हणी व त्यांचे अर्थ आम्हाला येथे contact_us@marathipremi.in सुचऊ शकता .

Leave a Comment