मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||Marathi Mhani idioms

Marathi Mhani Aani Arth मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms || Mhani in Marathi Start from th and Dh (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“थेंबे थेंबे तळे साचे.”

अर्थ: दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.

Meaning Of “थेंबे थेंबे तळे साचे.”=A collection of seemingly precious objects accumulates over time.

“थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान.”

अर्थ: मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.

Meaning Of “थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान.”=The patronage of elders is effective, the one who takes refuge is given greatness without any reason.

“थांबला तो संपला.”

अर्थ: काळाबरोबर जो पुढे जात नाही तो प्रगती करू शकत नाही.

Meaning Of “थांबला तो संपला.”=One who does not move with time cannot progress.

“थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.”

अर्थ: आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा आणि समाजातील घटकांशी प्रेमाने वागावे.

Meaning Of “थोडक्यात नटावे नि प्रेमाने भेटावे.”=Spend according to your means and treat the members of the society with love.

“थोराचे दुखणे आणि मणभर कुंथणे.”

अर्थ: मोठ्यांच्या आजाराची चर्चा सर्वत्र होत असते

Meaning Of “थोराचे दुखणे आणि मणभर कुंथणे.”=Elderly diseases are discussed everywhere.

“थोडक्यात गोडी, फारात लबाडी.”

अर्थ: कोणतीही गोष्ट मर्यादेतच करावी, मर्यादेबाहेर केल्यास वाईटपणा येतो.

Meaning Of “थोडक्यात गोडी, फारात लबाडी.”=Anything should be done within the limits, if done outside the limits, bad things happen.

“थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते.”

अर्थ: थंडीने आरंभी ओठ फुटतात आणि शेवटी पाय फुटतात.

Meaning Of “थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते.”=Cold first causes chapped lips and eventually chapped feet.

“दगडापेक्षा वीट मऊ.”

अर्थ: मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.

+Meaning Of “दगडापेक्षा वीट मऊ.”=A minor crisis is less damaging than a major crisis.

“दगडावरची रेष.”

अर्थ: दृढनिश्चय.

Meaning Of “दगडावरची रेष.”=Determination.

“दस की लकडी एक्का बोजा.”

अर्थ: प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.

Meaning Of “दस की लकडी एक्का बोजा.”=If everyone contributes a little, the big work is done with the cooperation of all.

“दहा गेले, पाच उरले.”

अर्थ: आयुष्य कमी उरणे.

Meaning Of “दहा गेले, पाच उरले.”=Short life.

“दाखविलं सोनं हसे मुल तान्हं.”

अर्थ: पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.

Meaning Of “दाखविलं सोनं हसे मुल तान्हं.”=Everyone is tempted by money. As soon as money is shown, things are done quickly.

“दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.”

अर्थ: एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.

Meaning Of “दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.”=Although one thing is adaptive, its counterpart is not adapted.

“दात कोरून पोट भरत नाही.”

अर्थ: मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.

Meaning Of “दात कोरून पोट भरत नाही.”=A little frugality is of no use in a big deal.

“दाम करी काम, बिवी करी सलाम.”

अर्थ: पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.

Meaning Of “दाम करी काम, बिवी करी सलाम.”=Any work is done once the money is spent.

“दिल चंगा तो कथौटी में गंगा.”

अर्थ: आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.

Meaning Of “दिल चंगा तो कथौटी में गंगा.”=If our heart is pure, we have holy Ganges.

“दिल्ली तो बहुत दूर है.”

अर्थ: झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.

Meaning Of “दिल्ली तो बहुत दूर है.”=A lot remains to be done in terms of work done.

“दिवस बुडाला मजूर उडाला.”

अर्थ: रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.

Meaning Of “दिवस बुडाला मजूर उडाला.”=Will the one who works daily and works with little understanding of himself? He will leave as soon as his working time ends.

“दिव्याखाली अंधार.”

अर्थ: मोठ्या माणसातदेखील दोष असतो.

Meaning Of “दिव्याखाली अंधार.”=Even a great man has faults.

“दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते.”

अर्थ: एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

Meaning Of “दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते.”=If there is a conflict in a matter, or to be careful in every case.

“दुभत्या गाईच्या लाथा गोड.”

अर्थ: ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.

Meaning Of “दुभत्या गाईच्या लाथा गोड.”=From whomever benefits, man also suffers.

“दुरून डोंगर साजरे.”

अर्थ: कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.

Meaning Of “दुरून डोंगर साजरे.”=Anything looks good from afar; But when you get closer, you get to know its true nature.

“दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.”

अर्थ: दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.

Meaning Of “दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.”=We see the small fault of another; But due to selfishness, one does not pay attention to one’s own major faults.

“देखल्या देवा दंडवत.”

अर्थ: सहज दिसले म्हणून चौकशी करणे.

Meaning Of “देखल्या देवा दंडवत.”=To inquire as to seem easy.

“देणे कुसळांचे घेणे मुसळाचे.”

अर्थ: पैसे कमी आणि काम जास्त.

Meaning Of “देणे कुसळांचे घेणे मुसळाचे.”=Less money and more work.

“देव तारी त्याला कोण मारी ?”

अर्थ: देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

Meaning Of “देव तारी त्याला कोण मारी ?”=.If there is grace of God, no one can harm us.

“देवा दंडवत.”

अर्थ: एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.

Meaning Of “देवा दंडवत.”=Asking for a compliment if you meet someone easily.

“देश तसा वेश.”

अर्थ: परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

Meaning Of “देश तसा वेश.”=Behavior that changes according to the situation.

“दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला.”

अर्थ: नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे.

Meaning Of “दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला.”=To be given but not to be taken.

“दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई.”

अर्थ: नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.

Meaning Of “दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई.”=Those who depend on fortune starve while the industrialists eat their fill.

“दैव देते आणि कर्म नेते.”

अर्थ: नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.

Meaning Of “दैव देते आणि कर्म नेते.”=Fortune flourishes; But one’s own actions cause damage.

“दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी.”

अर्थ: नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.

Meaning Of “दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी.”=If there is no luck, even the opportunity that comes close goes away.

“दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी.”

अर्थ: दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.

Meaning Of “दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी.”=Dependent on two things does not work.

“दे गा हरी पलंगावरी.”

अर्थ: कर्म नं करता फळाची आशा बाळगणे.

Meaning Of “दे गा हरी पलंगावरी.”=Hoping for fruit by do Nothing.

Leave a Comment