मराठी म्हणी व अर्थ || Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi ||Marathi Mhani idioms

Marathi Mhani Aani Arth मराठी भाषेत बोलली जाणारी सर्व ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ तुम्हाला मराठी व English मध्ये एकत्रित पणे मराठी प्रेमी च्या या पोस्ट मध्ये मिळतील .

म्हणी व त्यांचे अर्थ चांगल्या प्रकारे समजण्यासाठी म्हणी या स्वरूपात आणि त्यांचे अर्थ: या प्रकारात दाखविले आहेत.

ते पर्यन्त मराठी म्हणी व त्यांचे अर्थ: ||Marathi Mhani Aani Arth || Mhani in Marathi || Marathi Mhani idioms (मराठी व English मध्ये )

या मराठी म्हणीचा काय अर्थ आहे?

“ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला.”

अर्थ: वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो.

Meaning Of “ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला.”=Even a good person becomes corrupted in the company of a bad person.

“ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.”

अर्थ: कारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो.

Meaning Of “ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो.”=Even if the person in charge changes, there is not much change and that is the confusion.

“ढोंग धतोरा, हाती कटोरा.”

अर्थ: ढोंगी मनुष्‍याच्या नादी लागल्‍यास शेवटी हानि होते.

Meaning Of “ढोंग धतोरा, हाती कटोरा.”=Falling under the influence of a hypocrite ultimately results in loss.

“ढोरात ढोर पोरात पोर.”

अर्थ: वाटेल तेथे समावणारा मनुष्य

Meaning Of “ढोरात ढोर पोरात पोर.”=A man who accommodates wherever he wants

“तळे राखील तो पाणी चाखील.”

अर्थ: आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते.

Meaning Of “तळे राखील तो पाणी चाखील.”=Everyone has a tendency to get a little bit out of the work assigned to them.

“ताकापुरते रामायण.”

अर्थ: स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे.
आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे.
एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे

Meaning Of “ताकापुरते रामायण.”=Leaving quickly after achieving selfishness.

“तोंडाला पाने पुसणे.”

अर्थ: हमी देऊन समोरच्या व्यक्तीचे काम न करणे.

Meaning Of “तोंडाला पाने पुसणे.”=Not performing the work of the other person by guarantee.

“तोंड दाबून बुक्यांचा मार.”

अर्थ: एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे.

Meaning Of “तोंड दाबून बुक्यांचा मार.”=Punishing someone unnecessarily and also blocking the way for him to complain about it.

“तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले.”

अर्थ: फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.

Meaning Of “तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले.”=Due to the foolishness arising from two benefits, not achieving even a single goal.

“तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला.”

अर्थ: भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे.

Meaning Of “तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला.”=Inciting conflict instead of resolving it.

“तू राणी मी राणी पाणी कोण आणी.”

अर्थ: दोन सुकुमार ,नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही, असे व्यक्ती जवळ आल्यास एकमेकांचा एकमेकांना फटका बसतो.

Meaning Of “तू राणी मी राणी पाणी कोण आणी.”=When two delicate and sensitive individuals come together, they clash with each other and they never engage in any work.

“ताक कुंकून पिणे.”

अर्थ: प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करणे.

Meaning Of “ताक कुंकून पिणे.”=Handle every small matter with diligence and care.

“तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.”

अर्थ: जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.

Meaning Of “तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.”=Pursuing selfishness as long as one can benefit.

“तोबरयाला पुढे ,लगमला मागे.”

अर्थ: खायला पुढे कामाला मागे.
फायद्याचा वेळी पुढे पुढे ,
कामाच्या वेळी मात्र मागेमागे.

Meaning Of “तोबरयाला पुढे ,लगमला मागे.”=During times of profit, keep moving forward, at the time of work backward.

“ताकास तूर न लागू देणे.”

अर्थ: मनातील गोष्ट न सांगणे.

Meaning Of “ताकास तूर न लागू देणे.”=Don’t reveal the thoughts of the mind.

“तहान लागल्यावर विहीर खोदणे.”

अर्थ: गरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे.

Meaning Of “तहान लागल्यावर विहीर खोदणे.”=Prepare for something only when the need arises.

“तळ्यात मळ्यात करणे.”

अर्थ: मनाची अवस्था अस्थिर असणे.

Meaning Of “तळ्यात मळ्यात करणे.”=The state of the mind being unstable.

“ताकास जाऊन लोटा लपवणे.”

अर्थ: एखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे.

Meaning Of “ताकास जाऊन लोटा लपवणे.”=To hide something when one does not want it.

“तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.”

अर्थ: एखाद्याशी न पटणे पण तो लांब गेल्यावर त्याचीच आठवण काढणे किंवा त्याच्याबाबत विचारणे.

Meaning Of “तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना.”=Disagree with someone but remember or ask about him after he is gone.

“तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळ.”

अर्थ: तरुण माणूस आळशी असतो.

Meaning Of “तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळ.”=A young man is lazy.

“तीन तिघाडा काम बिघाडा.”

अर्थ: एखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते.

Meaning Of “तीन तिघाडा काम बिघाडा.”=If a task is done by too many people, it may fail.

“तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू दे.”

अर्थ: दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे.

Meaning Of “तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू दे.”=Even if someone else is harmed, it is possible to achieve one’s own selfishness.

“तळ हाताने सूर्य झाकला जात नाही.”

अर्थ: छोट्या गोष्टीनी फार मोठे व थोर बाबी दडवता येत नाही.

Meaning Of “तळ हाताने सूर्य झाकला जात नाही.”=Little things cannot hide big and great matters.

“तेरड्याचा रंग तीन दिवस.”

अर्थ: एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.

Meaning Of “तेरड्याचा रंग तीन दिवस.”=A task that goes on for a few days and suddenly stops.

“तुला न मला घाल कुत्र्याला.”

अर्थ: एखादी गोष्टं दोघानाही न मिळता फुकट जाणे.

Meaning Of “तुला न मला घाल कुत्र्याला.”=Not achieving anything in a matter for both parties involved.

Leave a Comment